Thursday, October 5, 2023

25 जिल्हा परिषदा आणि 14 महापालिकांच्या निवडणुकांबाबत मोठी बातमी

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीतच होतील अशी शक्यता आहे.याबाबत माहिती राज्याच्या नगरविकास आणि ग्रामपंचायत विभागातील

सूत्रांनी दिली आहे. सरकारने प्रशासकांना आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यासाठी नियोजन केल्याची माहिती आहे.त्यामुळे राज्यातील 25 जिल्हा परिषदा आणि 14 महापालिकांच्या

निवडणुका आणखी काही महिने पुढे ढकलण्यात येणार असल्याची माहिती आहे.राज्यातील 25 जिल्हा परिषदा, 14 महापालिका आणि 284 पंचायत समित्यांसह नगरपालिका, नगरपंचायतींवर सध्या प्रशासक आहेत.

देशात एप्रिल 2024 मध्ये महापालिका निवडणुका होणार आहेत. तर ऑक्टोबर 2024 मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे त्यापूर्वी महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका,

नगरपंचायतीच्या निवडणुका घ्याव्या लागणार आहेत. आता राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने प्रशासकास तीन महिन्यांची मुदतवाढ दिल्यास निवडणुका जूनपर्यंत पुढे जातील. त्यानंतर पावसाळा असल्याने

स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक दिवाळीतच होतील, अशी शक्यता आहे. दरम्यान, विरोधकांनी या निवडणुका घेण्याची मागणी केली. महाविकास आघाडीने शिंदे-फडणवीस सरकारमध्ये स्थानिक स्वराज्य निवडणुका

घेऊन दाखवा, असे आव्हान दिले आहे.दरम्यान शिंदे गट आणि भाजप अर्थात देवेंद्र फडणवीस यांना काहीही करुन मुंबई महापालिकेवर सत्ता हवी आहे. याबाबत मुंबई महापालिकेसाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजपची युती होईल

अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. शिंदे गटाने मुंबई महानगर महापालिकेवर विजय मिळवता यावा या दृष्टीने विभाग प्रमुखांची निवड करुन त्यांच्याकडे जबाबदारी दिली आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!