Monday, January 17, 2022

घरगुती गॅस महागण्याची शक्यता;गॅस सिलिंडरवरील सबसिडी बंद करण्याचा केंद्राचा विचार?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:सामान्यांचं कंबरडं पुन्हा एकदा मोडणार आहे. सिलेंडरच्या दरात पुन्हा एकदा वाढ होत आहे. वाढत्या महागाईत सामान्य माणसाला आणखी एक फटका बसणार आहे. ग्राहकांना आता घरगुती एलपीजी सिलेंडरकरता अधिकचे पैसे मोजावे लागणार आहे.

यामुळे सामान्यांमध्ये मोठी नाराज व्यक्त केली जात आहे. केंद्र सरकार एलपीजीला मिळणारी सबसिडी बंद करण्याच्या विचारात आहे. यासंदर्भात अधिकृतरीत्या आदेश काढलेला नसला तरी सरकारच्या आंतरिक मूल्यांकनात ग्राहक एका सिलिंडरसाठी एक हजार रुपये खर्च करण्यास सक्षम असल्याचा अहवाल देण्यात आला आहे.

एलपीजी सिलिंडरच्या सबसिडीसंदर्भात सरकारमध्ये दोन विचार आहेत. पहिल्या योजनेत आहे तसे चालू द्यायचे आणि दुसऱ्यात उज्ज्वला योजनेनुसार आर्थिकदृष्टय़ा कमजोर वर्गालाच सबसिडी द्यायचा विचार आहे. अर्थात सबसिडी देण्यासंदर्भात अजूनही स्पष्टता करण्यात आलेली नाही.

आर्थिक वर्ष 2020-21मध्ये सरकारने 3,559 कोटी रुपये सबसिडीच्या रूपात ग्राहकांना दिले होते. आर्थिक वर्ष 2019-2020मध्ये हा खर्च 24,468 कोटी इतका झाला होता. याचा अर्थ एकाच वर्षात सरकारने सबसिडीत सहा पटींनी कपात केली आहे. सध्याच्या नियमानुसार जर तुमचे वार्षिक उत्पन्न 10 लाख

रुपयांपेक्षा जास्त आहे तर आपल्याला सबसिडीचा लाभ मिळणार नाही. तसेच मे 2020मध्ये काही ठिकाणी एलपीजीवरील सबसिडी बंद केली आहे.गेल्या साडेसात वर्षांत घरगुती गॅसच्या सिलिंडरची किंमत (14.2 किलोग्रॅम) दुप्पट झाली आहे.

1 मार्च 2014 रोजी 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 410.5 रुपये होती. आता ती 884.50 रुपये इतकी झाली आहे.

ताज्या बातम्या

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...

या आमदाराची जीभ घसरली! रस्ते कंगना राणौतच्या गालापेक्षा चांगले करणार

माय महाराष्ट्र न्यूज:अभिनेत्री कंगणा रणौतविषयी वादग्रस्त वक्तव्य करून काँग्रेस आमदार डॉ. इरफान अन्सारी वादात सापडण्याची शक्यता आहे. जामताडामधील रस्ते कंगना रणौतच्या गालापेक्षाही चिकने बनवले...
error: Content is protected !!