Friday, January 21, 2022

आनंदाची बातमी:नगर जिल्ह्यात या ठिकाणी कांद्याला मिळाला 2300 रुपये भाव

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील राहाता व अकोले बाजार समितीत काल कांद्याला चांगला भाव मिळाला आहे. गुरुवारी राहाता बाजार समितीत 5308 गोणी कांद्याची आवक झाली. कांद्याला 2300 रुपये भाव मिळाला . कांदा नंबर 1 ला प्रति क्विंटलला 1800 ते 2300 असा भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 1250 ते 1750 असा भाव मिळाला.

कांदा नंबर 3 ला 600 ते 1200 रुपये इतका भाव मिळाला. गोल्टी कांदा 1300 ते 1600 व जोड कांदा 100 ते 600 रुपये भाव मिळाला. भाव मिळाला असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी दिली.

तर अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी कांद्याची चांगली आवक झाली. एक नंबर कांद्याला भावही 2251 रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला.अकोले बाजार समितीत कांद्याचे लिलाव झाले. यावेळी तालुक्यासह इतर तालुक्यातून कांद्याची आवक झाली.

एक नंबर कांद्याला 2251 रुपयांचा भाव प्रतिक्विंटल मिळाला. एक नंबर कांदा 1851 ते 2251, दोन नंबर कांदा 1601 ते 1851, तीन नंबर कांदा 1251ते 1651, गोल्टी कांदा 951 ते 1500, खाद 200 ते 600 प्रमाणे प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाले आहेत.शेतकरी वर्गाने आपला कांदा योग्य बाजार भाव

मिळण्यासाठी लिलावाच्या दिवशी सकाळी सात ते 11 वाजेपर्यंत कांदा 50 किलो बारदान गोणीत, वाळवून, निवड करुन बाजार समितीमध्ये विक्रीसाठी बाजार समितीच्या आवारात आणावा. बाजार आवारात प्रवेश करताना प्रवेशद्वारावरच प्रत्येकाने हाताला सॅनेटाईज करणे, नाकाला व तोंडाला मास्क लावणे, बाजार

आवारात कुणीही थुंकू नये, सोशल डिस्टनसिंग या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन बाजार समितिचे सभापती परबतराव नाईकवाडी, उपसभापती भरत देशमाने, संचालक व सचिव अरुण आभाळे यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!