Saturday, January 22, 2022

बलात्कार प्रकरणात राष्ट्रवादीचा युवा नेता अडचणीत; कोर्टाने दिले ‘हे’ आदेश

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख याच्यावर दाखल बलात्काराच्या गुन्ह्यात तथ्य नसल्याचा पोलिसांनी दिलेला ‘बी समरी’ अहवाल प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सचिन न्याहारकर यांनी फेटाळला. या प्रकरणात तपास अधिकाऱ्यांनी राजकीय दबावाखाली तपास केल्याचे दिसत आहे.

फिर्यादी तथा पीडितेच्या म्हणण्याऐवजी आरोपीच्या म्हणण्याच्या अनुषंगाने तपास करण्यात आला. फिर्यादीलाच खोटे ठरवण्याचा प्रयत्न केलेला दिसत असून सिडको पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांनी तपास करावा. पोलीस आयुक्तांनी योग्य त्या सूचना देऊन मार्गदर्शन करावे, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष महेबूब इब्राहिम शेख (रा. शिरूर , जि. बीड) याच्याविरुद्ध २८ डिसेंबर २०२० रोजी सिडको पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २९ वर्षीय पीडित तरुणी उच्चशिक्षित असून बायजीपुरा भागात भाड्याने राहते.

नोकरीचे आमिष दाखवून मुंबईला नेण्यासाठी म्हणून १४ नोव्हेंबर २०२० रोजी रात्री शेख याने कारमध्ये अत्याचार केला. आपण प्रतिकार केला. मात्र, तोंड दाबून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. पीडितेचे आरोप मेहबूब शेख याने समाजमाध्यमावरून प्रतिक्रिया देत फेटाळले होते.

पोलिसांनी तपास करून या प्रकरणात तथ्य नसून पीडिता आणि आरोपी यांची भेट झाल्यावरही शंका उपस्थित केली होती. सीसीटिव्हीत दोघे कुठे भेटल्याचे दिसत नाही, असे पोलिसांनी सांगितले होते. त्यावरून पोलिसांकडून ‘बी समरी’ अहवाल सादर करण्यात आला होता. त्यावर न्यायालयाने वरील मुद्दे उपस्थित करून अहवाल फेटाळला.

सहायक पोलीस आयुक्त निशिकांत भुजबळ यांनी हा अहवाल न्यायालयात सादर केला आहे. याप्रकरणी पीडितेने आपले म्हणणे मांडण्यासाठी अॅड. आय. डी. मणियार यांच्यामार्फत अर्ज दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या ‘बी समरी’ अहवालात योग्य ते पुरावे जोडलेले नाही.

त्यामुळे अहवाल स्वीकारणे योग्य नसून हा अहवाल रद्द करावा, असे सहायक सरकारी वकील जयमाला राठोड यांनी न्यायालयात सांगितले.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!