Saturday, January 22, 2022

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या महिला नेत्या किरीट सोमय्यांवर भडकल्या

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: ‘भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अहमदगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह महाविकास आघाडी सरकारवर बेछूट आरोप सुरू केले आहेत. त्यांनी ते आरोप थांबबावेत, अन्यथा त्यांच्याविरूद्ध अहमदनगर जिल्ह्यातही फौजदारी कारवाई केली जाईल,’ असा इशारा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा अ‍ॅड. शारदाताई लगड यांनी दिला आहे.

सोमय्या यांनी अहमदनगर जिल्ह्यात येऊनही सरकार आणि त्यातील नेत्यांवर जोरदार टीका केली. या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील सोमय्या यांच्याविरूद्ध प्रथमच प्रतिक्रिया उमटली आहे.

अ‍ॅड. लगड यांनी सांगितले की, ‘गेल्या काही दिवसांपासून सोमय्या यांनी आमचे नेते खासदार शरद पवार व अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मुश्रीफ यांच्यावर बिनबुडाचे आरोप सुरू केले आहेत. याशिवाय महाविकास आघाडी सरकारची बदनामी केली आहे. ज्या लोकांना सवंग प्रसिद्धीची सवय झाली आहे, ते असे बेछुट आरोप करतात.

सोमय्या यांनी हवेत गोळीबार करू नये. अनेक रथीमहारथींनी पवार यांच्या आरोप केले होते, परंतु त्यांचा एकही आरोप त्यांना शाबीत करता आला. उलट तुम्ही आमचे नेते पवार यांचा आदर्श घेऊन समाजात कसे वागल पाहिजे हे शिकून घ्या,’ असा सल्लाही लगड यांनी सोमय्या यांना दिला आहे.

अॅड. लगड यांनी पुढे बोलताना म्हणाल्या आहे की ‘तुम्ही महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांना ईडीची भीती दाखवू शकत नाही. ईडी काय तुम्हाला तुमच्या घरची मालमत्ता वाटते का? उठसुठ ईडीचा बागुलबुवा दाखवून बेछुट आरोप करण थांबवावे, अन्यथा आम्हाला तुमच्याविरुद्ध अहमदनगर जिल्ह्यात फौजदारी कारवाई करणे भाग पडेल,’ असा इशाराही अ‍ॅड. लगड यांनी दिला आहे.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!