Friday, January 21, 2022

काळजी घ्या:पुढील इतके दिवस पावसाचे

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. पुढील काही दिवसही पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने (IMD) सांगितले आहे. पुढील 5 दिवस राज्यात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होईल, असा IMD चा अंदाज आहे.

त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र , कोकणातही जोरदार पावसाचा अंदाज आहे. 24-25 तारखेला बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असल्याने राज्यभरात पुन्हा पर्जन्यवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.मध्य महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि घाट परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार

पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या विभागात पावसाचा जोर वाढणार आहे. तर पुणे, पालघर, नाशिक, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना येल्लो अलर्ट देण्यात आला आहे.

दरम्यान, यापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांसह नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.पुण्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानंतर पुढील सलग तीन दिवस पुण्यात वेगवान वाऱ्याच्या साथीने विजांच्या कडकडाटासह

मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. राज्यभरात पावसाचा अंदाज असला तरी मुंबईत पावसाचा जोरदार पावसाची शक्यता नाही. परंतु, काही ठिकाणी हलक्या सरी बरसू शकतात.दरम्यान, 1 जूनपासून पाऊस सुरु झाल्यानंतर प्रथमच राज्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये सरासरी व सरासरीपेक्षा जास्त

पाऊस झालेला दिसत असल्याचे चित्र आहे, अशी माहिती मुंबई हवामान विभागाचे उपमहासंचालक के. एस. होसाळीकर यांनी दिली आहे.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!