Tuesday, January 18, 2022

नितीन गडकरींची मोठी घोषणा; पेट्रोल आणि डिझेल बंद करायचंय

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:गाड्यांना सध्या जे हॉर्न आहेत त्याजागी भारतीय वाद्यांच्या आवाजाचे हॉर्न बसवले जाणार असल्याचं सांगितल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आता अॅम्ब्युलन्सच्या सायरन संदर्भात मोठी घोषणा केली. पुण्यात आयोजित कार्यक्रमात म्हटलं की,

मी आता आदेश काढणार आहे की ॲम्ब्युलन्सवर जर्मन संगीतकाराने तयार केलेले संगीत किंवा धुन वापरण्यात यावी.ॲम्ब्युलन्सवर आताचा कर्कश हॉर्न नको, असं त्यांनी म्हटलं आहे.

केंद्रीय मंत्री गडकरी पुण्यात म्हणाले की, पुण्यात मेट्रोचे काम प्रगतीपथावर आहे. पुण्यातील एअरपोर्टसाठी संरक्षण विभागाकडून जागा मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी संरक्षण विभागाकडून चंदीगडच्या आणि पुण्याच्या जागेची अदलाबदल करण्यात येईल. त्याला मंजुरी मिळालीय. पुण्यातील नदी

प्रकल्पालाही मंजुरी मिळालीय. पुण्यातही नागपुरप्रमाणे वाघोली ते शिरुर हा रस्ता पन्नास हजार कोटी खर्च करून बांधण्याचा विचार. हा रस्ता तीनमजली असेल. हे काम तीन मजल्याचे असेल. दोन मजले उड्डाणपूलाचे तर शेवटचा तिसरा मजला मेट्रोसाठी असेल. यासाठी मदत करण्यास केंद्र तयार आहे,

राज्याने त्यासाठी जी एस टी माफ करावी, असं त्यांनी म्हटलं आहे.ते म्हणाले की, मुंबईत नरिमन पॉईंटला दिल्लीला जोडण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी राज्य सरकार सोबत लवकरच बैठक घेणार आहे. पुणे ते कोल्हापूर, पुणे ते सोलापूर, पुणे ते बारामती अशा ज्या ज्या ठिकाणी ब्रॉडगेज रेल्वे आहे तिथे मेट्रो चालवता येईल.

याचे तिकिट रेल्वेच्या तिकीटाएवढे राहील. या मेट्रोला दोन मिलगाडीचे डबे असतील. ज्यामधून दुध, फळे यांची वाहतूक होईल. ही मेट्रो खाजगी व्यवसायिकांना चालविण्यास द्यावी, असं त्यांनी म्हटलं आहे.

पेट्रोल आणि डिझेल बंद करायचंय:
गडकरी म्हणाले की, माझ्या आयुष्यात पेट्रोल आणि डिझेल बंद करायचंय. मी राजीव बजाज यांना सांगितल की जोपर्यंत तुम्ही इथेनॉलवर चालणारी गाडी तयार करत नाही तोपर्यंत माझ्याकडे येऊ नका. त्यांनी तशी गाडी तयार केली. मी तीन ते चार महिन्यांत

ऑर्डर काढतोय की सर्व प्रकारच्या कारसाठी अगदी मर्सिडीज सुद्धा पेट्रोल आणि इथेनॉलवर चालू शकेल अशी इंजिन बसवावी लागतील. दुचाकीही इथेनॉलवर चालवता येतील, असं गडकरी म्हणाले.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!