Saturday, January 22, 2022

संतापजनक! ऑनलाईन क्लासमध्ये अज्ञात व्यक्तीकडून अश्लील कृत्य

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:मुंबईच्या शाहूनगर परिसरातील एका नामांकित महाविद्यालयाचे ऑनलाईन क्लास सुरू असताना मध्येच अज्ञात व्यक्तीकडून अश्लील मजकूर आणि कृत्य केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. महाविदयालयाकडून इयत्ता ९ वी चा क्लास सुरू असताना हा प्रकार घडला आहे.

अल्पवयीन मुलांना दिलेल्या झूम आयडीद्वारे आरोपींनी प्रवेश करून हे कृत्य केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मागील बऱ्याच दिवसांपासून हे महाविद्यालय ऑनलाइन वर्ग घेत आहेत. दरम्यान काल एका अज्ञात युवकानं ऑनलाईन क्लासच्या यंत्रणेत सहभागी होऊन हे खोडसाळ कृत्य केलं आहे.

या प्रकरणी शाहूनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यापासून जगभरातील शिक्षण क्षेत्र पूर्णपणे कोलमडून गेलं आहे.

कोरोनाकाळात विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून देशात अनेक शाळा आणि महाविद्यालयांकडून ऑनलाईन शिक्षणाचा अवलंब केला जात आहे. मात्र अशा घटना वारंवार होत असल्याचे निदर्शनास येत असल्याने पालकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!