Saturday, January 22, 2022

लसीकरणाबाबत केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:देशामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अनेकांना फटका बसला. आता ही दुसरी लाट ओसरताना दिसतेय. मात्र यानंतर आता संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका वर्तवण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने लसीकरण मोहीमेवर भर दिला आहे.

जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून याबाबत सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिव्यांग आणि आजारी व्यक्तींना लसीकरणासंदर्भात मोठा दिलासा दिला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णायनुसार दिव्यांग आणि आजारी व्यक्तींना

घरीच कोरोना प्रतिबंधक लस दिली जाणार आहे.
गुरुवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, दिव्यांग आणि आजारी व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी केंद्रावर जाण्याची गरज भासणार नाहीये. दिव्यांग आणि आजारी

व्यक्तींना घरीच कोरोनावरील लस दिली जाणार आहे. इतकंच नाही तर त्यासाठी त्यांना कुठल्याही प्रकारची नोंदणी करावी लागणार नाही. आरोग्य मंत्रालयाच्या या निर्णयामुळे दिव्यांग आणि आजारी व्यक्तींना मोठा दिलासा मिळाला आहे.
निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले की, “ज्या व्यक्ती

लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेऊ शकत नाही त्यांना घरीच लस देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांना कुठेही नोंदणी करावी लागणार नाही. तसंच, आम्हाला विश्वास आहे की आमची लस सुरक्षित आहे. ही लस घरी घेऊन जाण्यासाठी आम्ही जी व्यवस्था आणणार आहोत ती देखील सुरक्षित, प्रभावी आणि सहाय्यक असेल.

“यासाठी एसओपीचे पालन केलं जाईल. त्यासाठी आदेश जारी केले जातील. यामध्ये स्थानिक टीम सहभागी होतील. सध्या देशातील 18 वर्षांवरील 66 टक्के नागरिकांना कोरोना लसीचा एक डोस मिळाला आहे. तर 25 टक्के प्रौढ व्यक्तींना कोरोना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत,” असंही डॉ. पॉल यांनी सांगितलं आहे.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!