Tuesday, January 18, 2022

ठाकरे सरकार हे डाकू व माफियांचे

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:पारनेर सहकारी साखर कारखाना विक्री प्रक्रियेत झालेल्या घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी कारखाना बचाव समितीने सक्तवसुली संचालनालयाकडे (ईडी) केली होती. पारनेर कारखाना बचाव समितीच्या प्रतिनिधींनी नुकतीच दिल्ली येथे केंद्रीय अर्थमंत्री डॉ. भागवत कराड व ईडीचे मुख्य संचालक संजय मिश्रा यांची दिल्ली येथे भेट घेऊन ही मागणी केली होती.

दिल्ली येथे बचाव समितीने समाजसेवक माणिक जाधव व भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांची भेट घेतली. त्या वेळी सोमय्या यांनी कारखाण्याचे सभासद व शेतकरी यांच्याशी संवाद साधण्यासाठी येणार आहे असे आश्वासन दिले होते.

त्या नुसार सोमय्या यांनी आज पारनेर साखर कारखान्याला भेट दिली. तेथील कामगार, शेतकरी व पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी माजी मंत्री बाळा भेगडे, जिल्हाध्यक्ष ( दक्षिण ) अरूण मुंडे, कारखाना बचाव समितीचे रामदास घावटे, बबन कवाद, साहेबराव मोरे, विश्वनाथ थोरात, अश्विनी थोरात, सुनील थोरात, सागर मैड, सुभाष दुधाडे आदी उपस्थित होते.

किरीट सोमय्या म्हणाले, ठाकरे सरकार हे डाकू आणि माफियांचे सरकार आहे. त्यांचे सरकार स्थापन झाल्यापासून त्यांनी राज्यात हाहाःकार माजविला आहे. लोकांना घराबाहेर सुद्धा पडू देत नाहीत, ना गणेश दर्शन ना देव दर्शन या सरकारचा जन्मच मुळात भ्रष्टाचार व माफियागिरीतून झाला आहे.

जरंडजेश्वर साखर कारखाना ओंकार बिल्डरने विकत घेतला व लगेचच भाडेपट्याने चालविण्यास दिला मात्र हा कारखाना विकत घेण्यासाठी पैसे कोणी दिले ते पैसे कसे आले त्या धर्तीवर पारनेर कारखानाही क्रांती शुगरेने विकत घेतला. तो विकत घेण्यासाठी 32 कोटी रुपये कसे जमा केले त्यांना 23 कोटी रुपये अतुल चोरडीया व सात कोटी रूपये अक्षय लँड डेव्हलपर यांनी दिले ते कसे व कोणत्या मार्गाने दिले.

क्रांती शुगरकडे पैसेच नव्हते तर त्यांना कारखाना विकलाच कसा? कारखाण्यावरील कर्जापोटी राज्य सहकारी बँकेने मागणी पैशाची मागणी केल्यावर याच बँकेने क्रांती शुगरला कर्ज कसे दिले? शेतकरी व कामगार हितासाठी कारखाना चालला पाहिजे मात्र त्यात झालेल्या घोटाळ्याचीही चौकशी झाली पाहिजे व जर घोटाळा झाला

असेल तर त्यांना त्याची शिक्षाही झाली पाहिजे. पारनेर कारखाना विक्री प्रकरणी मी स्वताः लक्ष घालून कामगार व शेतकरी यांना न्याय मिळून दिल्या शिवाय राहणार नाही असेही सोमय्या यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!