Monday, January 17, 2022

सामूहिक बलात्कार करणाऱ्या नराधमांचा लिंगच्छेद करा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:डोंबिवलीतील सामूहिक बलात्काराच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरून गेलं आहे. या घटनेवर रिपाइंच्या महिला कार्यकर्त्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. या महिला कार्यकर्त्यांनी मानपाडा पोलीस ठाण्याबाहेर जमून जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली आहे.

सामूहिक बलात्कार करणाऱ्या नराधमांचा लिंगच्छेद करा, अशी संतप्त मागणी या महिला कार्यकर्त्यांनी केली आहे.एका अल्पवयीन तरुणीवर तब्बल 33 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना डोंबिवलीत समोर आली होती. देशाला हादरवून सोडणाऱ्या या घटनेनंतर आज रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी पोलीस

ठाण्यात जाऊन आरोपींना कडक शिक्षा देण्याची मागणी केली. यावेळी आरोपींना फाशी देऊ नका, तर त्यांचा लिंगच्छेद करून त्यांची गावागावात मिरवणूक काढा, अशी संतप्त मागणी रिपाइंच्या महिला कार्यकर्त्यांनी केली आहे. पोलिसांनी आरोपींना दयामाया न दाखवता पीडितेला न्याय मिळवून द्यावा,

अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. यावेळी या महिला कार्यकर्त्यांनी डोंबिवली पोलीस ठाण्याबाहेर घोषणाबाजी करत या घटनेचा निषेधही नोंदवला.दरम्यान, विद्यार्थी भारती या संघटनेनेही या घटनेचा निषेध नोंदवला आहे. विद्यार्थी भारती संघटनेने आज पोलिसांना निवेदन दिलं असून महिलांच्या सुरक्षेसाठी

कल्याण आणि डोंबिवलीत ग्रामपंचायत लेव्हलवर सुरक्षा व्यवस्था निर्माण करण्याची मागणी या संघटनेने केली आहे. विद्यार्थी भारतीने आज सकाळी 11.30 वाजता कल्याण पश्चिमेला तहसीलदार कार्यालयासमोरही निषेध आंदोलन केलं. तसेच कल्याण, डोंबिवलीत ठिकठिकामी कौन्सिलिंग सेंटर उभे करण्याची मागणीही केली.

बलात्कारासारख्या घटना थांबवण्यासाठी तरुण पिढीने पुढे यावे, असं आवाहन विद्यार्थी भारतीच्या राष्ट्रीय अध्यक्षा मंजिरी धुरी यांनी केले.दरम्यान, या घटनेप्रकरणी कालपर्यंत 26 जणांना पोलिसांनी अटक केली होती. आज आणखी दोघा जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यामुळे डोंबिवलीतील अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार प्रकरणातील

एकूण आरोपींची संख्या 28 वर गेली आहे. यामधील आरोपी नवी मुंबई, डोंबिवली येथे राहणारे असल्याची माहिती एसपी सोनाली ढोले यांनी दिली.

ताज्या बातम्या

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...

या आमदाराची जीभ घसरली! रस्ते कंगना राणौतच्या गालापेक्षा चांगले करणार

माय महाराष्ट्र न्यूज:अभिनेत्री कंगणा रणौतविषयी वादग्रस्त वक्तव्य करून काँग्रेस आमदार डॉ. इरफान अन्सारी वादात सापडण्याची शक्यता आहे. जामताडामधील रस्ते कंगना रणौतच्या गालापेक्षाही चिकने बनवले...
error: Content is protected !!