Tuesday, January 18, 2022

शाळा, महाविद्यालये सुरु करण्याबाबत अजित पवारांनी केले मोठे विधान

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात कोरोनाव्हायरसची दुसरी लाट ओसरली आहे. त्यात तिसऱ्या लाट येण्याची शक्यता देखील कमी असल्याचं बोललं जात आहे. मात्र, असं असलं तरी राज्यातील काही जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शाळा, महाविद्यालये कधी सुरू होणार,

यावर भाष्य केलं आहे.राज्यात लवकरच शाळा, महाविद्यालये सुरू करण्याबाबत भूमिका स्पष्ट करण्यात येईल, असे संकेत अजित पवार यांनी दिले आहेत. ऑक्टोबर महिन्यात कोरोनाबाबत आढावा घेतल्यानंतर शाळा, महाविद्यालये सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.

कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून शाळा बंद आहेत. ऑनलाइन वर्ग सुरू असले तरी त्याचा आता विद्यार्थ्यांना कंटाळा आला आहे. त्यात कोरोनाचा प्रादुर्भाव देखील कमी झाला आहे. नुकताच गणेशोत्सव पार पडला आहे. पुढील महिन्यात नवरात्रौत्सव, दसरा आहे. नोव्हेंबरमध्ये दिवाळी आहे.

गेल्यावर्ष या दिवसांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला होता. राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली होती. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये कोरोना स्थितीचा आढावा घेऊन दिवाळीनंतर राज्यात शाळा सुरू करण्याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.

राज्यात महाविद्यालये देखील टप्प्याटप्प्यानं सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो, याबाबत देखील चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असं देखील अजित पवार यांनी यावेळी सांगितलं. लहान मुलांचं लसीकरण झाल्यानंतर शाळा सुरू करण्याची आमची मानसिकता आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

अंतिम निर्णय हा शाळा, महाविद्यालये सुरु करण्याबाबत आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील. त्यानंतर निर्णय होईल, असे ते म्हणाले.राज्यात कोरोना नियंत्रणात आल्यानंतर टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. सध्या ग्रामीण भागात कोरोना रुग्ण नसलेल्या गावांमध्ये इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू आहेत.

तिसऱ्या लाटेचा धोका नाही:
राज्यात तिसऱ्या लाटेचा धोका नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात शाळा, महाविदयालये लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!