Thursday, January 20, 2022

नगर जिल्ह्यात दोन ठिकाणी धाडसी दरोडा रोख रकमेसह पंधरा ते वीस तोळे सोने चांदी लंपास

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील बेलापुर गावातील गो शाळेजवळ असणाऱ्या दोन ठिकाणी चोरट्यांनी धाडसी दरोडा टाकला असुन या दरोड्यात रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागीने घेवुन चोरटे पसार झाले आहे ही घटना समजताच तातडीने श्वान पथकही बोलविण्यात आले होते.

बेलापुर श्रीरामपुर रोडवर असणाऱ्या गो शाळेलगत उदय खंडागळे यांचा बंगला आहे रात्री दिड वाजे दरम्यान चोरट्यांनी खंडागळे यांच्या बंगल्याचा मुख्य दरवाजा तोडून आत प्रवेश केला चोरट्यांनी खंडागळे यांच्या घरात असलेल्या लहान
मुलीच्या गळ्याला चाकु लावला त्यामुळे घरातील सर्व जण घाबरले त्यांनी शांत बसणे पसंत केले

जवळपास दिड तास चोरट्यांनी घरात निवांतपणे उचका पाचक केली त्यांच्या घरातील लग्नाचा अलबमही चोरट्यांनी निवांतपणे पाहीला त्यातील घरातील महीलांचे फोटो शोधुन फोटोत अंगावर घातलेले दागीने लवकर काढुन द्या असेही चोरट्यांनी दरडावले एक फोटो पाहुन या महीलेच्या गळ्यातील हे दागीने लवकर द्या

अशीही मागणी चोरट्यांनी केली त्यावर हा फोटो आमच्या मावशीचा आहे असे सांगताच या फोटोतील महीला व ही महीला एकच वाटते असेही चोरटे म्हणाले खंडागळे यांच्या घरातुन जवळपास पंधरा ते वीस तोळे सोने व रोख रक्कमही चोरट्यांनी लांबविली त्यांनंतर भगीरथ चिंतामणी यांच्या लोखंडी दरवाजाचे

कुलुप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला त्यांच्या घरातुन ३५ हजार रुपये रोख चोरट्यांनी लांबविले भगीरथ चिंतामणी यांचा मुलगा सोमनाथ याने एका चोरट्याशी झटापट केली त्यात चोरट्याने त्यांच्या पायावर लोखंडी राँडने मारहाण केली सोमनाथनेही त्या चोरट्याला चांगलाच चोप दिला त्याने चोरट्याला पकडले असता

त्याच्या वडीलांना काय चालले हेच समजेना त्यांनी सोमनाथलाच मिठी मारली त्यामुळे तो चोरटा सोमनाथच्या तावडीतुन निसटला त्यामुळे चोराट्यांनी तेथुन पळ काढला त्या नंतर सोमनाथ याने बेलापुर पोलीसांना फोन करताच काही मिनीटातच बेलापुर पोलीस घटनास्थळी पोहोचले तो पर्यंत चोरटे पसार झाले होते

सकाळी श्वान पथक बोलविण्यात आले होते श्वानाने कुऱ्हे वस्ती रोडलगत माग दाखवीला त्या पुढे चोरटे वहानाने फरार झाले असावेत त्यानंतर सकाळी अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे यांनी घटनास्थळी भेट देवुन खंडागळे व चिंतामणी परिवारा कडून घटना कशी घडली या बाबत माहीती घेतली व अधिकाऱ्यांना तपासा

बाबत योग्य त्या सुचना दिल्या त्यांच्या समवेत उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके पोलीस निरीक्षक संजय सानप पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायवट हवालदार अतुल लोटके व त्यांचा स्टाफ होता घटनेची माहीती मिळताच जि प सदस्य शरद नवले सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे यांच्यासह अनेकांनी

घटनास्थळी भेट देवुन खंडागळे व चिंतामणी परीवाराला धीर दिला या वेळी अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे यांनी ग्राम रक्षक दल स्थापन करण्याच्या सूचना जि प सदस्य शरद नवले यांना दिल्या असुन आज सायंकाळी बेलापुर पोलीस स्टेशन येथे बैठक बोलविण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...

तुमच्या घरात कोरोनाबाधित व्यक्ती आहे? तर या टीप्स करा, कोरोनापासून रहा सुरक्षीत

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आपला बचाव कसा करावा, तसेच जर आपल्या घरात एखाद्या...
error: Content is protected !!