Tuesday, January 18, 2022

पुणे, अहमदनगरसाठी स्वस्तातली मेट्रो घ्या: केंद्रीय गडकरी यांची अजितदादांना विनंती

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :मी एक नवीन मेट्रो शोधलीये. तिची किंमत 1 कोटी प्रति किमी आहे. या मेट्रोसाठी फुकटात पुण्यातला कन्सल्टंट बनायला तयार आहे. पुणे ते कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, बारामती, लोणावळा जेवढे ब्रॉडगेज आहेत, त्यावर ही आठ डब्ब्यांची मेट्रो चालू शकते, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवार पुण्यात सांगितले. 

पुण्यातील सिंहगड रस्ता उड्डाणपुलाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. त्यावेळी गडकरी यांनी ही माहित दिली. ही मेट्रो आहे तरी कशी आणि ती बिनपैशांची म्हणजे फुकट कशी मिळू शकेल, याचे गणित नितीन गडकरींनी सांगितले.

नागपूरसाठी आपण या 100 मेट्रो बुक केल्या आहेत, पुण्यासाठीही अशा 100 मेट्रो घ्याव्यात, अशी विनंती देखील त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केली. ते म्हणाले, या मेट्रोला चार इकोनॉमी क्लासचे एअर कंडिशन्ड इंटरनॅशनल स्टँडर्डचे डबे आहेत. दोन बिझनेस क्लास विमानासारखे डबे आहेत. वायफाय, टीव्ही फुकट आहेत. विमानाप्रमाणेच चहा, नाश्ता मिळेल.

याचे तिकीट एसटीच्या तिकीटाप्रमाणे ठेवले आहे.
तासाला पॅसेंजर 35 किमी जाते, एक्स्प्रेस 60 किमी जाते. पण आमच्या मेट्रोचा स्पीड 140 किमी प्रतितास आहे. 140 किमी प्रतितास वेग, इकोनॉमी क्लास आणि बिझनेस क्लासचे डब्बे, मोफत वायफाय-टीव्ही अशा अनेक सुविधा आणि फायदे असलेली

मेट्रो पुण्यासाठी देखील विकत घ्यावी, अशी विनंती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना केली आहे.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!