Thursday, January 20, 2022

या मार्केटमध्ये लाल कांदाला मिळाला ५००० भाव

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:उमराणे येथील स्व. निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत आज नवा म्हणजे लाल कांदा प्रथमच विक्रीसाठी आला होता. मुहूर्तावर आलेल्या या लाल कांद्याचा लिलाव मार्केटमधील शेतकरी व्यापाऱ्यांच्या मोठ्या उपस्थितीत झाला. यावेळी यंदाचा विक्रमी बाजारभाव या कांद्याला मिळाला आहे.

५ हजार १०१ रुपये असा सर्वोच्च भाव या कांद्याला मिळाला. कळमधरी येथील उत्पादक शेतकरी बाबुराव चौधरी यांच्या कांद्याला सर्वोच्च ५ हजार १०१ रुपयांची बोली लागल्याने त्यांचा बाजारसमिती आवारात सत्कार करण्यात आला.
केतन ट्रेडर्सच्या केतन बाफणा यांनी हा कांदा खरेदी केला. सदर शेतकऱ्याचा बाजार

समितीतर्फे सचिव नितीन जाधव, व्यापारी असोसिएशन तर्फे सुनिल देवरे व गौरव बाफणा यांनी शेतकरी बाबुराव चौधरी यांचा सत्कार केला.सन्मान केल्याबद्दल चौधरी आनंदित झाले व बाजार समितीचे आभार मानले याप्रसंगी प्रशासक फय्याज मुलानी, व्यापारी असो अध्यक्ष संदेश बाफना, मार्गदर्शक सुनील देवरे, संतोष बाफणा,

प्रवीण देवरे, केतन बाफना, मुन्ना आहेर, हेमंत मोरे, रमेश वाघ, महेंद्र मोदी रामदास गायकवाड, संतोष देवरे सतीश देवरे, गौरव बाफना उपसचिव तुषार गायकवाड आदि कांदा व भुसार व्यापारी शेतकरी उपस्थित होते.दरम्यान, उन्हाळ कांदा जास्तीत जास्त 2 हजार 223 रुपये ते कमीत कमी 700 रुपये असा होता. सरासरी हा दर 1 हजार 900 रुपये भाव मिळाला.

ताज्या बातम्या

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...

तुमच्या घरात कोरोनाबाधित व्यक्ती आहे? तर या टीप्स करा, कोरोनापासून रहा सुरक्षीत

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आपला बचाव कसा करावा, तसेच जर आपल्या घरात एखाद्या...
error: Content is protected !!