Tuesday, January 18, 2022

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : लवकरच जमा होणार किसान सन्मान योजनेचा 10 हप्ता

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान शेतकरी योजनेअंतर्गत देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये मिळतात. सरकार हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात ऑनलाइन हस्तांतरित करते. तुम्हीही शेतकरी असाल पण या योजनेचा लाभ घेऊ शकत नसाल, तर काळजी करण्याची गरज नाही. आपले

नाव पंतप्रधान किसान सन्मान निधीमध्ये देखील नोंदवू शकता जेणेकरून सरकारच्या योजनेचा फायदा घेऊ शकता.दरम्यान  वर्षाकाठी शेतकऱ्यांना 6 हजार रुपये देऊन केंद्र सरकार हे शेतकऱ्यांचा सन्मान करीत आहे. आता जमा होणारा हप्ता हा 10 वा असून त्याची रक्कम देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर लदकरच जमा होणार आहे.

जर तुम्ही पंतप्रधान किसान योजनेचे लाभार्थी असाल, तर लवकरच रक्कम खात्यामध्ये जमा झाल्याची आनंदवार्ता मिळू शकते. सरकारने पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत 10 वा हप्ता जाहीर करण्याची तारीख निश्चित केली आहे. त्या अनुशंगाने आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्यात आली आहे.

त्यामुळे सध्याच्या प्रतिकूल परस्थितीमध्ये शेतकऱ्यांना या रकमेचा आधार मिळू शकतो.आतापर्यंत या योजनेतून केंद्राने देशातील 11.37 कोटी शेतकऱ्यांना 1.58 लाख कोटी रुपये हस्तांतरित केले आहेत. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 10 वा हप्ता 15 डिसेंबर 2021 पर्यंत जाहीर करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे.

गेल्या वर्षी 25 डिसेंबर 2020 रोजी सरकारने शेतकऱ्यांना पैसे हस्तांतरित केले. चार महिन्यातून एकदा ही रक्कम शेतकऱ्यांना हस्तांतरीत केली जाते.पंतप्रधान किसान योजनेचा शेवटचा हप्ता ज्या शेतकऱ्यांना मिळाला नसेल त्यांनी पुढील हप्त्यासह आगोदरची रक्कमही मिळणार आहे. म्हणजे त्या शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 4 हजार रुपये जमा होणार आहेत.

याकरिता नोंदणीची शेवटची तारीख ही 30 सप्टेंबर आहे. याकरिता केवळ पंतप्रधान किसानच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा लागेल. जर तुमचा अर्ज स्वीकारला गेला, तर तुम्हाला ऑक्टोबरमध्ये आणखी एक 2000 चा आणि डिसेंबरमध्ये 2000 चा हप्ता मिळणार आहे.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!