Thursday, January 20, 2022

भानसहिवरे येथे बालकाचा आहार-कुपोषण जनजागृती कार्यक्रम संपन्न

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

तालुक्यातील भानसहिवरे येथे राष्ट्रीय पोषण माह निमित्त बालकाचा आहार आणि कुपोषणाची कारणे, या विषयी दोन दिवशीय जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अहमदनगर येथील क्षेत्रीय लोकसंपर्क ब्यूरो आणि अहमदनगर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमास नेवासा पंचायत समितीचे उपसभापती किशोर जोजार, भानसहिवरा गामपंच्यातीच्या सरपंच मिनातीई जोजार, महिला बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी मनोज ससे, क्षेत्रीय प्रचार आधिकारी माधव जायभाये, सहायक क्षेत्रीय प्रचार अधिकारी पी. कुमार, बालविकास प्रकल्प अधिकारी सोपान ढाकणे, डॉ. ढवण आदि मान्यवर उपस्थित होते.

निरोगी समाज, कुपोषण मुक्त भारत आणि वयक्तिक विकास व देशाच्या निरंतर प्रगतीसाठी आई आणि बाळाच्या पोषण आहाराकडे घरातील प्रत्येक सदस्यांनी लक्ष दिले पाहिजे, किशोरवयीन मुली, गरोदर माता, शून्य ते 6 वयोवर्षे गटातील मुलांच्या पोषण आहाराकडे घरातील प्रत्येत व्यक्तिंनी काळजीपुर्वक लक्ष देऊन त्यांना सकस पोषणयुक्त आहार दिला पाहिजे तसेच स्त्री पुरुष असा कसलाही भेदभाव न करता किशोरवयीन मुलीच्या आहाराबरोबरच गरोदर माता, बालकांच्या दैनंदिन पौष्टीक आहारात कड़धान्य, स्थानिक फळे आणि भाजीपाला, दूध या घटकांचा समावेश असावा व त्यांच्या आवडी-निवडी प्रमाणे पोषक आहार दिल्यास कुपोषणाचा प्रश्न मिटेल आणि आई-बालके कुठल्याच आजाराला बळी पडणार नाहीत असे मत आज या कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवरांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाची सुरुवात गावात पोषण आहार रॅलीने करण्यात आली यावेळी गावातील किशोरवयीन मुली, अंगणवाडी कार्यकर्त्या मदतनीस यांनी हतात पोषण आहाराचे विविध पदार्थ, कडधान्य, फळे आणि भाजीपाला घेऊन सर्वांचे लक्ष वेधले.

आंगणवाडी कार्यकर्त्या आणि मदतनिस यांनी घरच्या घरीच स्थानिक अन्नधान्य, फळे आणि पालेभाज्यातून तयार केलेल्या पोषण आहार प्रदर्शनात जवळपास 80 प्रकारच्या पदार्थ आसलेल्या ताटांचा समावेस होता.

दोन दिवशीय या अभियानात, रांगोळी, सकस आहार, सूदृढ बालक तसेच आदर्श माता स्पर्धा घेण्यात आल्या, या स्पर्धेतील गुनवंत किशोरवयीन मुली आणि विजेत्या 26 स्पर्धकांचा तसेच पोषण आहार कार्यक्रम राबविणा-या आंगणवाडी कार्यकर्त्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पोरितोषिक देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी जयहिंद कलामंचाचे शाहिर हमीद सय्यद यांनी सांस्कृतिक कार्यक्रमातून पोषण आहारविषयी जनजागृती केली.
केंद्र सरकार तसेच राज्य सरकारच्या वतिने राष्ट्रीय पोषण माह 2021, निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून जनतेमध्ये आई- बाळाच्या आरोग्यासाठी पोषण आहाराचे महत्व पटऊन देण्यासाठी विशेष जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या निमित्त ‘सही पोषण देश रोषण’ या युक्ती प्रमाणे देशात वेगवेगळ्या माध्यमातून कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पर्यवेक्षिका शामला गायधने यांनी केले तर प्रास्ताविक क्षेत्रीय प्रचार आधिकारी माधव जायभाये यांनी केले.

 

ताज्या बातम्या

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...

तुमच्या घरात कोरोनाबाधित व्यक्ती आहे? तर या टीप्स करा, कोरोनापासून रहा सुरक्षीत

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आपला बचाव कसा करावा, तसेच जर आपल्या घरात एखाद्या...
error: Content is protected !!