Friday, January 21, 2022

सुक्या खोबऱ्याचे हे आरोग्यदायी जबरदस्त फायदे ;चार नंबरचा फायदा तर खुप जोरात

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:  तुमच्या घरात नेहमी सुके खोबरे असते. मात्र,  तुम्हाला या सुक्या खोबऱ्याचे फायदे किती आहेत, हे बऱ्यादा माहीत नसते. सुके खोबरे हृदय आणि मेंदूसाठी खूप चांगले आहे. सुक्या खोबऱ्या रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते. तसेच शरीराला व्हायरल इन्फेक्शनपासून दूर ठेवण्यास मदत होते आणि त्वचेसाठीही खूप गुणकारी आहे.

– अनेक घरांत सुक्या खोबऱ्याचा वापर नेहमी होत असतो. कोकणात खोबऱ्याचा जेवणात नेहमी वापर होत असते. तसेच खोबऱ्या वापर हा खीर, आइस्क्रीम, स्वीट डिश, मिठाई, मांसांहारी जेवणात मसाला बनवण्यासाठी केला जातो. खोबऱ्यामुळे अन्नाची चव वाढते होते. पण हेच सुके खोबरे आरोग्यासाठी महत्वाचे आहे.

वाळलेल्या नारळामध्ये भरपूर पोषक घटक देखील असतात. सुके खोबरे हृदय आणि मेंदूसाठी खूप चांगले आहे. ते रोग प्रतिकारशक्ती वाढवते आणि शरीराला व्हायरल इन्फेक्शनपासून दूर ठेवण्यास मदत करते.

रक्तप्रवाह चांगला राहतो – सुक्या खोबऱ्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह चांगला राहतो. नारळात फिनोलिक संयुगे असतात, जी अँटीऑक्सिडंट्स म्हणून काम करतात. ते शरीराच्या पेशींचे ऑक्सिडेटिव्ह नुकसान टाळतात. त्यामध्ये गॅलिक अ‍ॅसिड, कॅफीक अ‍ॅसिड, सॅलिसिलिक अ‍ॅसिड, P-Coumaric अ‍ॅसिडचा समावेश आहे.

– खोबऱ्यामुळे लोहाच्या कमतरतेची समस्या दूर होते. सुक्या नारळामध्ये लोह खूप जास्त प्रमाणात आढळते. शरीरातील लोहाची कमतरता ती खाल्ल्याने पूर्ण होऊ शकते.  तसेच रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. प्रथिने, जीवनसत्त्वे, लोह, कॅल्शियम, मॅंगनीज आणि सेलेनियम हे प्रामुख्याने सुक्या खोबऱ्यात आढळतात.

– रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करून हे पोषक घटक विषाणूजन्य रोगांपासून शरीराचे रक्षण होते. सुक्या खोबऱ्यातील अनेक पोषक घटक शरीराला मिळतात. आहारात नारळाचा समावेश केल्याने संधिवात आणि ऑस्टियोपोरोसिससारख्या समस्यांचा धोकाही कमी होतो.

स्मरणशक्ती वाढते – कोरडे खोबरे खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते. मानसिक आरोग्यासाठी सुके खोबरे खूप महत्वाचे आहे. अभ्यासामध्ये असे सांगितले गेले आहे की नारळाचे तेल अल्झायमर रोखण्यास मदत करते.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!