Thursday, January 20, 2022

आरे वा:या महिन्यापर्यंत होणार कोरोनाचा शेवट;मोठी माहिती समोर

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:कोविड -19 या साथीच्या  आजारापासून अजून जगाची सुटका झालेली नाही. अनेक देशांमध्ये कोरोनाची तिसरी लाट आलेली आहे. भारतातदेखील कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे लसीकरणावर अधिक भर दिला जात आहे. लहान मुलांनाही लस देण्याची

तयारी जोरात सुरू आहे. पण इतक्या सगळ्या प्रयत्नांनंतर कोरोना महासाथीचा अंत कधी होईल, या प्रश्न आहेच. याचं उत्तर संशोधकांना सापडलं आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाचं अखेरच्या टप्प्यात असं रूपांतर होईल, की तो अगदी सामान्य सर्दीसारखा सौम्य होऊन जाईल .या महासाथीचा शेवट सर्वसामान्य सर्दी-खोकल्याच्या

आजाराप्रमाणे होईल, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.
प्रा. डेम सारा गिलबर्ट आणि सर जॉन बेल यांच्या म्हणण्यानुसार, कोरोनाव्हायरसचे अजून धोकादायक व्हेरिएंट आता येण्याची शक्यता कमीच आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतले मेडिसीन विषयाचे प्राध्यापक सर जॉन बेल यांच्या

म्हणण्यानुसार, या विषाणूचा प्रभाव येत्या वसंत ऋतूपर्यंत म्हणजेच फेब्रुवारी-मार्चपर्यंत सामान्य सर्दी -खोकल्यासारखा होऊन जाईल. कारण लोकांची इम्युनिटी लसीकरण आणि विषाणूशी सामना करताना मोठ्या प्रमाणावर वाढलेली असेल.

स्थिती लवकरच सुधारेल:
जॉन बेल यांच्या म्हणण्यानुसार, लोकांनी लस घेतल्यानंतरही त्यांना विषाणूशी सामना करावा लागत आहे यूकेमधली स्थिती अधिक वाईट आहे. मात्र हिवाळा संपल्यानंतर ती सुधारेल असं वाटतं. मॉडर्ना कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीफन बेन्सेल यांनीदेखील सांगितलं आहे, की जागतिक पातळीवर लशींचा पुरवठा वाढत असल्यानं कोरोना महासाथ आता एका वर्षाच्या आत संपुष्टात येईल.

स्थिती बदलत आहे:
प्रा. गिल्बर्ट यांनी सांगितलं, की विषाणू जसजसा पसरत आहे तसतसा तो कमजोर होत आहे. यावर भाष्य करताना सर जॉन यांनी नमूद केलं, की ज्या प्रकारचा ट्रेंड दिसत आहे, त्यानुसार पुढील सहा महिन्यांत आपण चांगल्या स्थितीत पोहोचू शकतो.

त्यामुळे ताण कमी होत आहे. कोरोनामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या मृत्यूचं प्रमाण जास्त आहे; मात्र हे मृत्यू निश्चितपणे कोरोनामुळेच झाले याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

ताज्या बातम्या

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...

तुमच्या घरात कोरोनाबाधित व्यक्ती आहे? तर या टीप्स करा, कोरोनापासून रहा सुरक्षीत

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आपला बचाव कसा करावा, तसेच जर आपल्या घरात एखाद्या...
error: Content is protected !!