Saturday, January 22, 2022

महाराष्ट्रात मंदिरं खुली होणार, पण वाचा 17 मोठे नियम

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:महाविकास आघाडी सरकारनं अखेर राज्यातली मंदिरं तसच इतर धार्मिक स्थळं खुली करण्याची घोषणा केलीय. गेल्या वर्षभरात जवळपास कोविडच्या ह्या संपूर्ण काळात महाराष्ट्रातली सर्व धार्मिक स्थळं बंदच आहेत. सरकारच्या घोषणेनंतर ती 7 ऑक्टोबरपासून उघडली जातील.

त्यामुळे भक्त मंडळी एकाच वेळेस ठिकठिकाणी गर्दी करण्याची शक्यता आहेत. पण कोविडचं संकट अजून संपलेलं नाही. त्यामुळे धार्मिक स्थळं, त्यांची ट्रस्ट मंडळी, आणि प्रार्थनेसाठी येणाऱ्या मंडळींनी नेमके कोणते नियम पाळायचे याची नियमावलीच आज राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आली.

1. धार्मिक स्थळांनी प्रवेशद्वारावर सॅनिटायझर तसच स्क्रिनिंगची व्यवस्था करणं अनिवार्य

2. ज्यांना कोरोनाची लक्षणं नाहीत, फक्त त्यांनाच धार्मिक स्थळांच्या परिसरात प्रवेश
3.ज्यांनी मास्क घातलेला आहे किंवा तोंड झाकलेलं आहे त्यांनाच प्रवेश मिळेल

4.कोविड रोखण्यासाठी सुचना देणारे फलक लावणं अनिवार्य, तसच ऑडिओ व्हिडीओही धार्मिक स्थळांमध्ये टाईम टू टाईम लावले जावेत.
5. एखाद्या मंदिरात, धार्मिक स्थळात एकाच वेळी किती जणांना प्रवेश द्यायचा ते ट्रस्टनं ठरवायचं आहे. व्हेंटिलेशन, उपलब्ध जागा या सर्व गोष्टी लक्षात घेऊन निर्णय घ्यावा. अर्थातच त्यासाठी स्थानिक प्रशासनासोबत समन्वय ठेवावा.

6. प्रत्येकानं बुटं, चप्पला वाहनातच सोडाव्यात. कुटुंबियांनी आणि प्रत्येकानं ते स्वतंत्र ठेवावेत.
7. धार्मिक स्थळाच्या परिसरातली दुकानं, कॅफेटेरिया, स्टॉल्सनी सोशल डिस्टन्सिंग पाळावं
8. येणाऱ्या जाणाऱ्यांमध्ये सामाजिक अंतर ठेवण्यासाठी प्रॉपर मार्किंग करावी.

9. धार्मिक स्थळांमध्ये आत आणि बाहेर पडण्याचे वेगवेगळे मार्ग असावेत.
10. धार्मिक स्थळांमध्ये प्रवेश करताना दोघात कमीत कमी 6 फुटाचं अंतर असावं. याची जबाबदारी धार्मिक स्थळांच्या मॅनेजमेंटची असेल.
11. लोकांनी प्रवेश करण्यापूर्वी साबनानं हात धुवावीत, सॅनिटायजर मारावा.

12. धार्मिक स्थळांमध्ये बसताना सोशल डिस्टन्सिंग पाळला जावं. परिसरात जास्तीत जास्त मोकळी हवा राहील याची काळजी घ्यावी. एअर कंडिशन 24 ते 30 अंश सेल्सि. एवढं ठेवावं.
13. मुर्ती, धार्मिक ग्रंथ, पुतळे यांना हात लावता येणार नाही.
14. धार्मिक स्थळांवर कुठलंही मोठं कार्य ज्यामुळे गर्दी होईल असं करता येणार नाही.

15. भजन, किर्तन किंवा इतर धार्मिक गायन पूर्णपणे बंद असेल. पण धार्मिक गीतं वाजवता येतील.
16. कॉमन प्रार्थना चटई टाळावी. भक्तांनी त्यांची स्वत:ची चटई किंवा तत्सम कापड सोबत घेऊन यावे.
17. धार्मिक स्थळांमध्ये प्रसाद वाटणे, तुषार शिंपडणे अशा गोष्टी पूर्णपणे बंद असतील.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!