Tuesday, January 18, 2022

धोका वाढला:नगर जिल्ह्यातील या तालुक्यातील २७ गावे प्रतिबंधित क्षेत्र घोषित

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यभरात कोविड रुग्णसंख्येत घट होत असली अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुका अद्यापही बाधितांच्या संख्येत जिल्ह्यात आघाडीवर आहे. मागील दहा दिवसांपासून तालुक्यात शंभरपेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत.

त्यामुळे प्रशासनाने पुन्हा प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. शहरात चार ठिकाणी, तसेच तालुक्यातील २७ गावांत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.सुमारे दोन वर्षांपासून कोविड महामारीने जनजीवन विस्कळित आहे. शासनस्तरावर प्रतिबंधात्मक उपाययोजना व लसीकरण सुरू आहे.

लसीकरणानंतर नागरिकांमध्ये वाढलेली बेफिकिरी व सणासुदीच्या काळात पुन्हा नव्या जोमाने, मागची कसर भरून काढण्यासाठी सुरू झालेली कापड, किराणा व इतर खरेदीसाठी दुकानांमध्ये गर्दी वाढते आहे. कोविडची भीती कमी झाल्याने

दुकानदारांसह ग्राहकांकडून नियमांची पायमल्ली करण्याची प्रवृत्ती बळावली आहे. दुकानांसमोर सॅनिटायझर व मास्कशिवाय प्रवेश नसल्याचे लावलेले फलक केवळ औपचारिकता म्हणून लावले गेले आहेत.

गेल्या काही दिवसांतील विवाह समारंभ, साखरपुडे, वराती, अंत्यविधी, तेरावे आदी सार्वजनिक उपक्रमांना गर्दी वाढल्याने, अनेक गावांतील कुटुंबांना कोविडची लागण झाली आहे. त्यामुळे तहसीलदार अमोल निकम यांनी संगमनेर शहरातील गणेशनगर, जनतानगर व भरतनगर येथील काही भाग २३ सप्टेंबरपर्यंत

प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित केला होता. तालुक्यातील पिंप्री- लौकी- अजमपूर, खळी, जाखुरी, पानोडी, हजारवाडी, तळेगाव दिघे, मनोली, घुलेवाडी, कनोली, शेडगाव, पिंपरणे, निमगाव बुद्रुक, निमगाव जाळी, आश्वी खुर्द, राजापूर, सायखिंडी, गुंजाळवाडी, वनकुटे, चिकणी, आश्वी बुद्रुक, खांडगाव, वडगाव लांडगा,

मांडवे बुद्रुक, चंदनापुरी, कोल्हेवाडी, चिंचपूर बुद्रुक यातील काही गावे पूर्ण, तर काही गावांतील वाड्या-वस्त्या तीन ऑक्टोबरपर्यंत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केल्या आहेत.

कोविड सेंटरचा रुग्णांना दिलासा हॉटेले, उपाहारगृहे, दुकाने जोमाने सुरू असल्याने संगमनेर शहरात रोज गर्दीचा उच्चांक होत आहे. मागील दहा दिवसांत कोविडच्या आकडेवारीने शंभरची संख्या सातत्याने पार केली आहे. तालुक्यातील सहा ते सात कोविड केअर सेंटर अद्यापही कार्यरत असल्याने रुग्णांना थोडा दिलासा मिळत आहे.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!