Tuesday, January 18, 2022

केंद्र सरकारच्या धोरणांच्या विरोधात आशा सेविकांचा राज्यव्यापी बंद

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकारच्या धोरणांच्या विरोधात तसेच राज्य शासनाची संबंधित योजना कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत आज एक दिवसीय संप आयोजित करण्यात आला होता या संपामध्ये श्रीरामपूर तालुक्यातील सर्व आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांनी सहभाग घेतला होता त्यांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन

श्रीरामपूर येथील तालुका आरोग्य अधिकारी तहसीलदार यांना दिले यावेळी राज्य शासन तसेच केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
सदर कृति समिती मधील सर्व INTVC. ALTVC. CITV, AIUTUCTVCC, AICTU, LPF, UTVC या सर्व केंद्रीय कामगार संघटनांनी पुकारलेला असून त्यातील महाराष्ट्रातील महाराष्ट्र राज्य

आशा व गटप्रवर्तक सहभागी होणार आहेत. आपल्या देशातील नागरिकांना आरोग्य, शिक्षण, पोषण, रोजगार आदी मुलभुत क्षेत्रातील सेवा देणान्या केंद्र व राज्याच्या विविध योजना मधील मानधनी, कामावर आधारीत मोबदला आदी सरकारी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा म्हणजेच राष्ट्रीय आरोग्य अभियानातील

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक कर्मचारी यांचाही यात समावेश होतो व विविध मागण्यांसाठी हा संप कृति समितीच्या वतीने पुकारण्यात आला होता.सर्व आशा व गटप्रवर्तक यांना कोविड कामकाज करताना सुरक्षा साधने पुरविण्यात यावीत. दि. १७ जुलै २०२० च्या शासन निर्णयानुसार

राज्य निधी मधून आशा वर्कर यांना २००० रुपये व गटप्रवर्तक यांना ३००० रुपये मोबदल्यात वाढ केली मात्र एप्रिल २०२१ ते सप्टेंबर २०२१ अखेरचा मोबदला दिला नाही, तो ताबडतोब देण्यात यावा.दि. २३ जून २०२१ रोजी मा. आरोग्य मंत्री यांचे बरोबर कृती समिती बैठकीतील चर्चेनुसार दि. १ जुलै २०२१ पासून आशा

१००० रुपये व गटप्रवर्तक १२०० रुपये व कोविड पत्ता ५०० रुपये बाद करण्याचे ठरले आहे. ते दिवाळीपूर्वी देण्यात यावे, दि. ९ सप्टेंबर २०२१ रोजी आरोग्य विभागाने आदेश निर्गमित केला आहे, त्यातील मुद्दा क्र.४ विसंगत आहे. तो त्वरीत दुरुस्त करण्यात यावा. मा. वंदना गुरनानी, अतिरिक्त सचिव व संचालक एन.एच. एम.

दिल्ली यांचे दि.२०/०४/२०२० च्या आदेशानुसार कोविड काळात आशा व गटप्रवर्तक यांचे कोणत्याही प्रकारे मानधनात कपात करु नये, या आदेशाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. दि. १ एप्रिल २०२१ पासूनच्या ७२ कामाचा आशा स्वयंसेविकाचा थकीत मोबदला त्वरीत देण्यात यावा.

सी.एच.ओ. च्या जागा त्वरीत भरण्यात याव्यात, जेथे सी.एच.ओ. नाही तेथे आशा वर्कर यांना काम करावे लागते मात्र मोबदला दिला जात नाही, तो आरोग्य वर्धीनी या नावाने असणारा आशांना १००० रुपये मोबदला फरकासह द्यावा.आरोग्य विभागातील रिक्त जागा भरताना ५०% आशा व गटप्रवर्तक मधून भराव्यात.

विविध कामाचे सर्व्हे गटप्रवर्तकाकडून करुन घेतली जातात, मात्र त्याचा मोबदला दिला जात नाही, त्यासाठी १५०० रुपये गटप्रवर्तक यांना जादा मानधन द्यावे. प्रधानमंत्री मातृ योजनेचे काम गटप्रवर्तक यांना सांगितले जाते, त्याचे प्रत्येक केसचे २५० रुपये देण्यात यावेत. प्रेरणा प्रकल्प रिपोर्टींगसाठी गटप्रवर्तक यांना दर

सहामाहीसाठी १५०० रुपये भत्ता देण्यात यावा. २०१० पासून आशा व गटप्रवर्तक यांना सातही दिवस वेगवेगळी कामे करावी लागतात म्हणून त्यांना कायम कर्मचारी दर्जा देऊन शासकीय कर्मचाऱ्यानुसार पगार देण्यात यावे.आशा व गटप्रवर्तक यांना सन्मानाची वागणूक द्या.आशा व गटप्रवर्तकांवर हल्ला

झाल्यास त्याची शासनामार्फत त्वरीत दखल घेऊन हल्ला करणाऱ्यास अटक करुन खटला दाखल करावा.कोविड काळात बाधित आशा व गटप्रवर्तक यांचे न दिलेले मानधन त्वरीत देण्यात यावे. आरोग्य वर्धिनीमध्ये गटप्रवर्तक यांना सामावून घ्यावे.सॉफ्टवेअर मोबदला गटप्रवर्तक यांचा कट न करता दर महिन्याला देण्यात यावा.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!