Tuesday, January 18, 2022

म्हणून आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी मागितली माफी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी सकाळी परभणी येथे बोलताना, ‘आरोग्य सेवेच्या परीक्षा अत्यंत पारदर्शक होणार असून परीक्षार्थींना कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये’, असे आवाहन केले होते. मात्र, अवघ्या १२ तासांत कोलांटउडी

घेत प्रचंड अनागोंदी असलेली आरोग्य विभागाची गट ‘क’ आणि गट ‘ड’ साठीची लेखी परीक्षा अखेर पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. यासंबंधी परीक्षार्थींना मोबाईलवर संदेश पाठविण्यात आले. शनिवारी (ता. २५) आणि रविवारी (ता. २६) आरोग्यसेवेतील पदांसाठी लेखी परीक्षा आयोजित करण्यात आली होती.

परंतु, त्यासाठी आवश्यक प्रवेश पत्रच अनेक विद्यार्थ्यांना शुक्रवारी रात्रीपर्यंत मिळाले नाही. ज्यांना मिळाले त्यांच्या प्रवेश पत्रात परीक्षा केंद्राबद्दल प्रचंड गोंधळ होता. दरम्यान, परीक्षा पुढे ढकलल्यानं उमेदवारांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलं याबद्दल राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली आहे.

राजेश टोपे म्हणाले की, विद्यार्थ्यांना जो मानसिक त्रास झाला याला न्यासा ही संस्था जबाबदार आहे. त्यांच्या असमर्थतेमुळे ही परीक्षा पुढे ढकलली. मी आरोग्य विभागाचा प्रमुख म्हणून तुमची माफी मागतो आणि दिलगिरी व्यक्त करतो. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये राज्यात तिसरी लाट उंबरठ्यावर आहे. माझा हेतू स्पष्ट आणि प्रामाणिक आहे.

भरतीप्रक्रियेसाठी मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव घेऊन गेलो आणि याला मान्यता मिळवून घेतली. वर्षानुवर्षे रिक्त जागा आणि त्या संदर्भातील निर्णय़ घेण्यात आला होता. मात्र परीक्षा पुढे ढकलण्याचं मला दु:ख. ही परीक्षा आठवड्याभरात किंवा दहा दिवसात घेण्यासाठी प्रयत्न करेन असं आश्वासनही यावेळी राजेश टोपेंनी दिलं.

परीक्षा घेण्याची जबाबदारी सोपवलेली संस्था न्यासाच्या अकार्यक्षमतेमुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. गट क आणि गट ड च्या जागा भरण्यासाठी आरोग्य विभागाचे सेवा प्रवेश नियमानुसार भरण्यात येणार आहे. ही परीक्षा लेखी स्वरुपात घेण्यासाठी कार्यपद्धती आहे. माहिती तंत्रज्ञान विभागाने

ओएमआर पद्धतीने परीक्षा घेण्यास सांगितलं आहे. त्यासाठी संस्थांची निवड करण्यात आली. ती निवड आरोग्य विभागाने डेमो आणि परीक्षा घेऊन न्यासाची निवड केली. त्या संस्थेसोबत करार करण्यात आल्याचे राजेश टोपे म्हणाले.आरोग्य विभागाची जबाबदारी फक्त प्रश्न पत्रिका तयार करणं हीच आहे.

आरोग्य विभागाने तयार केलेली प्रश्नपत्रिकांची छपाई, त्यांचे वितरण, राज्यात लागणारी केंद्र तयार करणे, तिथले व्यवस्था पाहणे, स्टिकर्स, नंबर याची सर्व खातरजमा करणे इत्यादी कामे ही संबंधित संस्थांची असतात. इलेक्ट्रिक उपकरणांच्या सहाय्याने होणारे गैरप्रकार रोखणे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती काळजी घेण्याचं

काम त्यांच्याकडे सोपवलं. आऱोग्य विभाग याचा सातत्यानं आढावा घेत होतं. जेव्हा दिरंगाई जाणवली तेव्हा संबंधितांना विचारणाही केली. तर त्यांनी खात्री दिली होती. मी स्वत: जेव्हा आढावा घेतला त्यावेळी त्यांनी शुक्रवारपर्यंत सर्व होईल असं सांगितलं. मात्र ऐनवेळी व्यवस्थेत त्रुटी असल्याचं समोर आल्याचंही राजेश टोपे म्हणाले.

याबाबत त्यांनी एक उदाहरण सांगताना म्हटलं की, एका ठिकाणी हजार मुलांना बसण्याची यादी दिली पण बसण्याची व्यवस्था सहाशे सातशे इतकी होती. उर्वरित मुलांच्या बैठकीचा प्रश्न होता. पूर्ण आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी बसून पुन्हा आढावा घेतला असता अनेक त्रुटी आढळल्या. बसण्याची बैठक व्यवस्था अपुरी असल्याचं दिसून आलं.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!