Thursday, January 20, 2022

हा व्यवसाय, एकदा सुरू करा मग काय सुरु झाल्यास पैसाच पैसा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:लाल मातीच्या विटांऐवजी औष्णिक ऊर्जा प्रकल्पांमधून कोळशाच्या राखेपासून बनवलेल्या विटा वापरण्याचा कल वाढलाय. याचा वापर घरे, दुकाने, नाले बनवण्यासाठी केला जाऊ लागलाय. आता छोट्या शहरांमध्येही फ्लाय

अॅश विटांनी घरे बांधली जात आहेत. जर तुमची स्वतःची जमीन असेल आणि तुम्ही व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही फ्लाय अॅश विटा बनवण्याचा व्यवसाय सुरू करू शकता. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्ही सरकारची मदत देखील घेऊ शकता.

खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने (KVIC) फ्लाय अॅश ब्रिक्सवर एक अहवाल तयार केलाय. या अहवालात राखेपासून विटा बनवण्याच्या व्यवसायाची संपूर्ण ब्ल्यू प्रिंट तयार करण्यात आलीय. प्रकल्प अहवालानुसार हा व्यवसाय सुरू करण्यासाठी 20.30 लाख रुपये खर्च येतो. जर तुमच्याकडे

व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसे नसतील तर तुम्ही बँकेकडून कर्ज घेऊन सुरुवात करू शकता. प्रधानमंत्री रोजगार योजनेंतर्गत या व्यवसायासाठी कर्ज घेता येते. याशिवाय मुद्रा कर्ज योजनेचा पर्यायही उपलब्ध आहे.केव्हीआयसीने तयार केलेल्या अहवालानुसार फ्लाय अॅश विटांचा व्यवसाय 20.30 लाख रुपयांपासून सुरू होईल.

यामध्ये आपली स्वतःची जमीन असावी. उपकरणांची किंमत 8.55 लाख रुपये असेल. वर्क शेड बांधण्यासाठी 6 लाख रुपये खर्च येणार आहे. तसेच कार्यरत भांडवल म्हणून 5.75 लाख रुपये आवश्यक आहेत. एकूण प्रकल्पाची किंमत 20,30,000 रुपये होती.

अहवालानुसार, फ्लाय अॅश ब्रिक्स प्लांटमधून दरवर्षी 50000 विटा बनवल्या जातील. 5 लाख विटा तयार करण्यासाठी वार्षिक 34,75,700 रुपये खर्च येईल. 5 लाख विटांच्या विक्रीतून 40 लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल, असे प्रकल्पात सांगण्यात आलेय. यामध्ये सर्व खर्च वजा केल्यानंतर

तुमचा निव्वळ नफा 4.90 लाख रुपये होईल म्हणजेच महिन्यामध्ये तुमची कमाई 34,000 रुपयांपेक्षा जास्त असेल.जर तुम्ही इमारत बांधण्यासाठी खर्च केलेले पैसे भाड्यात रुपांतरित केले, म्हणजेच इमारत बांधण्याऐवजी ते भाड्याने घेतले, तर प्रकल्पाचा खर्च कमी होईल आणि नफा वाढेल.

ताज्या बातम्या

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...

तुमच्या घरात कोरोनाबाधित व्यक्ती आहे? तर या टीप्स करा, कोरोनापासून रहा सुरक्षीत

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आपला बचाव कसा करावा, तसेच जर आपल्या घरात एखाद्या...
error: Content is protected !!