Friday, January 21, 2022

मुंबईत ऑनलाइन क्लासमध्ये लावला अश्लील विडिओ मग पुढे …

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:मुंबईच्या धारावी येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत ऑनलाइन पद्धतीने क्लासेस सुरू होते. ऑनलाइन पद्धतीने शिक्षक शिकवत असताना, एका अज्ञात तरुणाने बनावट नावाने संबंधित क्लासमध्ये घुसखोरी करत अश्लील व्हिडीओ सुरू केला होता.

हा धक्कादायक प्रकार पाहून शिक्षकांसह विद्यार्थिनींना धक्का बसला होता. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम जेठालाल गढा आणि एका मुलीच्या बनावट प्रोफाइल तयार करून आरोपींनी संबंधित क्लासमध्ये घुसखोरी केली होती. जीव याप्रकरणी शाळेच्या प्राचार्यांच्या तक्रारीवरून शाहूनगर पोलीस ठाण्यात

विनयभंग, पोक्सो आणि माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी 7 सप्टेंबर पासून 17 सप्टेंबर पर्यत तब्बल अकरा दिवस हा अश्लील प्रकार केला आहे. अखेर या घटनेची माहिती प्राचार्यांना मिळाल्यानंतर त्यांनी गुरुवारी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

वर्गातील एका मुलीला संबोधून आरोपींनी हा अश्लील प्रकार केला आहे. ऑनलाइन क्लासची लिंक वर्गातील एका विद्यार्थ्यानेच आरोपींना पाठवल्याचा संशय पोलिसांना आहे. आरोपींना क्लासची लिंक कुठून मिळाली? याचा तपास पोलीस करत आहेत. विशेष म्हणजे यापूर्वी देखील मुंबईत बऱ्याच शाळेत असे प्रकार घडले आहेत.

काही दिवसांपूर्वी मीरा रोड येथील एका शाळेत देखील असाच प्रकार उघडकीस आला होता. आरोपींनी लिंकद्वारे क्लासमध्ये घुसखोरी करत एका अल्पवयीन मुलीला अश्लील शब्दांत शिवीगाळ केली होती.कोरोना संसर्ग  सुरू झाल्यानंतर देशभरात ऑनलाइन क्लास घेतले जात आहेत. पण दरम्यान गुन्हेगारी वृत्तीच्या

काही विद्यार्थ्यांकडून भलतेच उद्योग केले जात आहेत. अशातच मुंबईतील एका इंग्रजी शाळेच्या इयत्ता नववीच्या ऑनलाइन वर्गात अश्लील व्हिडीओ सुरू केल्याची घटना उघडकीस आली आहे.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!