Friday, January 21, 2022

अतिशय म्हत्वाचे:21 दिवस बंद राहणार बँका, त्याआधी पूर्ण करा सर्व आवश्यक कामं

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:सप्टेंबर महिना संपायला काहीच दिवस शिल्लक आहेत. दरम्यान तुमची बँकेत काही कामं असतील तर ती लवकर पूर्ण करा. कारण पुढील महिन्यात नवरात्र, दसरा या सणासमारंभानिमित्त बराच काळासाठी बँका बंद राहणार आहेत. ऑक्टोबर महिन्यात जवळपास 21 दिवस बँका बंद असतील.

नेमके तुम्ही जर सुट्टीच्या दिवशी बँकेत गेलात तर तुमच्या कामाचा खोळंबा होऊ शकतो. त्यामुळे त्याआधी कोणत्या दिवशी बँकांना सुट्ट्या आहेत हे जाणून घ्या. या बँक हॉलिडेमुळे तुमच्या बँकिंगविषयीच्या कामात अडथळा येऊ शकतो. अर्थात प्रत्येक राज्यानुसार बँकांच्या सुट्ट्या वेगवेगळ्या असू शकतात.

बँक हॉलिडे प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळे असतात, कारण काही सण-समारंभ असे असतात की जे ठराविक राज्यातच साजरे केले जातात. ज्या राज्यात सुट्ट्या निश्चित करण्यात आल्या आहेत त्याठिकाणी बँकांचे कामकाज बंद राहील. त्यामुळे त्यानुसार योजना आखूनच तुम्ही बँकेमध्ये जा.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून बँक सुट्ट्यांची यादी (Bank Holiday List) जारी केली जाते. https://rbi.org.in/Scripts/HolidayMatrixDisplay.aspx या वेबसाइटला भेट देऊन तुम्ही सुट्ट्यांची यादी तपासू शकता. प्रत्येत महिन्याची यादी याठिकाणी पाहता येईल.

आरबीआयच्या वेबसाइटवर ऑक्टोबर महिन्यातील सुट्ट्यांची यादी तुम्हाला तपासता येईल. या 21 दिवसांच्या सुट्ट्यांमध्ये साप्ताहिक सुट्ट्यांचा देखील समावेश आहे. या दरम्यान काही ठिकाणी तर सलग पाच दिवस देखील बँका बंद आहेत.

तपासा सुट्ट्यांची यादी
>ऑक्टोबर 1 – गंगटोकमे ध्यबँक खाती अर्धवार्षिक बंद करणे
> 2 ऑक्टोबर – महात्मा गांधी जयंती (सर्व राज्ये)
> 3 ऑक्टोबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
> 6 ऑक्टोबर – महालय अमावस्या (आगरतळा, बंगळुरू, कोलकाता)

> 7 ऑक्टोबर – लेनिंगथौ सनमही (इम्फाळ) चे मेरा चाओरेन हौबा
> 9 ऑक्टोबर – दुसरा शनिवार (साप्ताहिक सुट्टी)
> 10 ऑक्टोबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)

12 ऑक्टोबर – दुर्गा पूजा (महा सप्तमी) / (आगरतळा, कोलकाता)
> 13 ऑक्टोबर – दुर्गा पूजा (महा अष्टमी) / (आगरतळा, भुवनेश्वर, गंगटोक, गुवाहाटी, इम्फाळ, कोलकाता, पाटणा, रांची)

> 14 ऑक्टोबर – दुर्गा पूजा/दसरा महा नवमी/आयुथा पूजा (आगरतळा, बंगळुरू, चेन्नई, गंगटोक, गुवाहाटी, कानपूर, कोची, कोलकाता, लखनऊ, पाटणा, रांची, शिलाँग, श्रीनगर, तिरुअनंतपुरम)
> 15 ऑक्टोबर – दुर्गा पूजा/दसरा/विजया दशमी/(इम्फाळ आणि शिमला वगळता सर्व बँका)
> 16 ऑक्टोबर – दुर्गा पूजा (दसैन)/ (गंगटोक)
> 17 ऑक्टोबर – रविवार

> 18 ऑक्टोबर – काटी बिहू (गुवाहाटी)
> 19 ऑक्टोबर-ईद-ए-मिलाद/ईद-ए-मिलादुन्नबी/मिलाद-ए-शेरीफ (पैगंबर मोहम्मद यांचा वाढदिवस)/बारावफाट/(अहमदाबाद, बेलापूर, भोपाळ, चेन्नई, डेहराडून, हैदराबाद, इम्फाळ, जम्मू, कानपूर, कोची , लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, रायपूर, रांची, श्रीनगर, तिरुअनंतपुरम)

>20 ऑक्टोबर-महर्षी वाल्मिकी यांचा वाढदिवस/लक्ष्मी पूजा/ईद-ए-मिलाद (आगरतळा, बंगळुरू, चंदीगड, कोलकाता, शिमला)
> 22 ऑक्टोबर – ईद-ए-मिलाद-उल-नबी (जम्मू, श्रीनगर) नंतर शुक्रवार
> 23 ऑक्टोबर – चौथा शनिवार
> 24 ऑक्टोबर – रविवार
> 26 ऑक्टोबर – प्रवेश दिवस (जम्मू, श्रीनगर)
> 31 ऑक्टोबर – रविवार

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!