Tuesday, January 18, 2022

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार:पती-पत्नीच्या वैयक्तिक भांडणात ‘कलम ३५३’ चा वापर

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र :शासकीय स्तरावरुन सुरू असलेल्या कामात विनाकारण अटकाव करणे, राजकीय दंडेलशाहीचा वापर करत अधिकार्‍यांना त्यांच्या कर्तव्यापासून रोखणे अशा घटनांमध्ये सरकारी कामात अडथळा आणल्याचे गुन्हे दाखल होतात. शासकीय अधिकार्‍यांसाठी हे एक सुरक्षा कवच मानले जाते.

मात्र, अलिकडच्या काळात या कायद्याचा गैरवापर वाढला आहे. आता तर पती-पत्नीच्या वैयक्तिक भांडणात या ‘कलम ३५३’ चा वापर झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नगर शहरात हा प्रकार घडला आहे. एका शासकीय अधिकारी असलेल्या पतीने स्वतःच्या पत्नीविरोधातच सरकारी कामात

अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पती-पत्नीच्या भांडणातही ‘कलम ३५३’ चा वापर झाल्‍याने हा चर्चेचा विषय ठरला आहे.नगर शहरातील एका दाम्पत्याचा वाद थेट सरकारी कार्यालयापर्यंत पोहचला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात काही दिवसांपूर्वी ही घटना घडली. त्यातून पत्नीने पतीच्या सरकारी

कामात अडथळा आणल्याप्रकरणी येथील तोफखाना पोलिस ठाण्यात पत्नीविरोधात ‘कलम ३५३ ’ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. शासकीय कर्मचारी असलेले विजयकुमार दिलीप वाईकर (वय 30, रा.गुलमोर रोड, नगर) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.

वाईकर हे त्यांच्या कार्यालयात काम करत असताना त्यांची पत्नी आल्‍या. त्‍यांनी वाईकर यांच्याकडे पगाराच्या स्लीप मागत आरडाओरडा करुन शिवीगाळ केली. पगाराच्या स्लीप न दिल्यास माझ्या जीवाचे बरेवाईट करुन घेईन, अशी धमकीही त्‍यांनी दिली. त्यांच्या हातातील शासकीय कामाच्या फायली हिसकावून फेकून दिल्या.

तसेच वाईकर शासकीय कामानिमित्त मिटींगसाठी बाहेर जात असताना रस्ता अडवून तू ऑफीसचे काम कसे करतो, असे म्हणत शासकीय कामात अडथळा आणल्याची फिर्याद या सरकारी कर्मचार्‍याने दिली आहे.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!