Tuesday, January 18, 2022

शिवाजी कर्डीलेंना मोठा धक्का;अत्यंत जवळच्या सहकार्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज : अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत नगरपंचायतचे नगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी चार नगरसेवक आणि पदाधिकाऱ्या-कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हस्ते व आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला.

नामदेव राऊत हे माजी मंत्री राम शिंदे आणि खासदार सुजय विखे-पाटील यांचे खंदे समर्थक मानले जात होते. मात्र, राऊत हे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर आहेत. त्यामुळे नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर रोहित पवारांच्या या खेळीमुळं राम शिंदे यांनी सुजय विखे-पाटील यांना हा मोठा धक्का असणार आहे.

राऊत यांच्या मागे कर्जत शहरातील मोठी ताकद असल्याचं मानलं जातं. त्यामुळे नगर परिषद निवडणुकीत शिंदे यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.दरम्यान आज माजी आमदार शिवाजी कर्डीले यांचे कट्टर समर्थक तथा राहुरीचे नगरसेवक शहाजी जाधव व अन्य मंडळींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

यामुळे भाजप तथा माजी आमदार शिवाजी कर्डिले यांना मोठा धक्का बसला आहे.भाजपचे माजी आमदार शिवाजीराव कर्डीले यांचे कट्टर समर्थक तथा राहुरी नगरपालिका नगरसेवक शहाजी जाधव, मधुकर पोपळघट, आबासाहेब रावसाहेब येवले यांनी आपल्या समर्थकासह राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे,

जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके ,रोहिदास कर्डीले, नगराध्यक्ष अनिल कासार व नगरसेवकांच्या उपस्थितीत नगर येथील राष्ट्रवादी भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!