Thursday, January 20, 2022

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी भरसभेत दाखवलं असे काही

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे त्यांच्या फटकेबाजीसाठी प्रसिद्ध आहेत. पुण्यातील कार्यक्रमातही त्यांनी आपल्या भाषणात नेहमीप्रमाणे फटकेबाजी केली. यावेळी त्यांच्यासोबत मंचावर खासदार संभाजीराजे छत्रपती होते.

यावेळी भाषण करताना रावसाहेब दानवे यांनी त्यांच्या फाटलेल्या शर्टचा किस्सा सांगितला.मी सगळी पदं उपभोगली. मला मतदारसंघातील लोकांनी भरभरुन पदं दिली, मी केंद्रात तीनवेळा मंत्री जरी झालो असलो तरी साधेपणा सोडला नाही.

काल मी हैद्राबादला आमच्या एका मित्राकडे गेलो होतो. मोठा माणूस आहे तो, तेव्हा तो म्हणाला, दादा तुम्ही खादीचा शर्ट घ्या. का तर म्हणाला तुमचा शर्ट फाटलाय. नवीन शर्ट घ्या. मी म्हटलं शर्ट फाटलाय म्हणून काय फरक पडला? आता इथे तुम्ही सगळे पुण्याची माणसं आहेत, यात कुणी फाटक्या शर्टचा माणूस

येऊन बसलाय का मला सांगा बरं. घरातील बाईने तुमच्या तुम्हाला सांगितलं असेल, तुमचं शर्ट फाटलंय, बदलून घ्या. असा कुणी माणूस आहे का फाटलेला शर्टाचा.. बघा माझा शर्ट इथे फाटलाय, असं म्हणत रावसाहेब दानवे यांनी भर मंचावर त्यांचा फाटलेला शर्ट दाखवला.

यावेळी रावसाहेब दानवे यांनी निवडणुकीवेळचाही किस्सा सांगितला. निवडणुकीत दरम्यान आजारी असतानाही मी साडेतीन लाखाच्या फरकाने निवडून आलो. निवडून आल्याचे प्रमाणपत्र घेण्यावेळी शिवसेनेचे अर्जुन खोतकर आणि बबनराव लोणीकर माझ्यासोबत होते. त्यावेळी लोणीकर म्हणाले एकही सभा

न घेता इतक्या मोठ्या फरकाने दानवे निवडून कसे आले. त्यावर खोतकर म्हणाले लोकांना वाटले असेल हा लई सीरियस असेल, शेवटचं मत देऊन टाकावं म्हणून निवडून आले असतील, असा किस्सा दानवेंनी सांगितला.

ताज्या बातम्या

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...

तुमच्या घरात कोरोनाबाधित व्यक्ती आहे? तर या टीप्स करा, कोरोनापासून रहा सुरक्षीत

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आपला बचाव कसा करावा, तसेच जर आपल्या घरात एखाद्या...
error: Content is protected !!