Wednesday, December 8, 2021

मुख्‍यमंत्र्यांनी हा विषय व्‍यक्तिगत प्रतिष्‍ठेचा केला होता का? राधाकृष्ण विखेंच सवाल

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्‍यातील मंदिर उघडण्‍यासाठी महाविकास आघाडी सरकारला घटस्‍थापनेचा मुहूर्त सापडला असला तरी, केवळ भाजपच्‍या मागणीला विरोध म्‍हणून इतके दिवस मुख्‍यमंत्र्यांनी हा विषय व्‍यक्तिगत प्रतिष्‍ठेचा केला होता का? असा सवाल भाजपाचे जेष्‍ठनेते आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी उपस्थित केला.

आरोग्‍य विभागाच्‍या परिक्षेच्‍या संदर्भात झालेल्‍या गोंधळावर भाष्‍य करताना आ.विखे पाटील म्‍हणाले की, महाविकास आघाडी सरकारचा सावळा गोंधळ रोजच सुरु आहे. त्‍याचे परिणाम विद्यार्थ्‍यांना भोगावे लागत आहेत. महाविकास आघाडी सरकार सगळ्याच परिक्षेत नापास झाले आहे.

सरकारच्‍या अनिश्चिततेचा परिणाम जनतेला भोगावा लागत असल्‍याची टिकाही आ.विखे पाटील यांनी यावेळी केली.माध्‍यमांशी बोलताना आ.विखे पाटील म्‍हणाले की, इतर राज्‍यांमध्‍ये नियमावली करुन मंदिर केव्‍हाच उघडण्‍यात आली. तिरुपती देवस्‍थान, वैष्‍णोदेवी

यांसारखी मोठी देवस्‍थानही कोव्‍हीड नियमांचे पालन करुन भाविकांसाठी उघडण्‍यात आली. आपल्‍या राज्‍यात मात्र मंदिर उघडण्‍यास महाविकास आघाडी सरकारने जाणीवपूर्वक उशिर केला. केवळ भाजपाची मागणी होती म्‍हणून हा प्रश्‍न सरकारने व्‍यक्तिगत केला अशी टिका त्‍यांनी केली.

राज्‍यातील एकीकडे मॉल सुरु झाले, बियरबार सुरु होते, एस.टी बसेस‍ही सुरु झाल्‍या मग फक्‍त भाविक मंदिरात गेल्‍यानेच कोरोना होणार होता का? हा नकारात्‍मक दृष्‍टीकोन घेवून मुख्‍यमंत्री काम करणार असतील तर राज्‍याचा विकास कारण्‍याच्‍या केवळ गप्‍पा ठरल्‍या आहेत, जनतेचा त्‍यांच्‍यावर भरवसा राहिलेला नसल्‍याचे आ.विखे पाटील म्‍हणाले.

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!