Tuesday, November 30, 2021

करोनाची काळजी घ्या. तिसऱ्या लाटेचा धोका कायम:महसूलमंत्री थोरात

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:यंदा साखरेला चांगला भाव मिळत आहे. यामुळे जिल्हा बँकेच्या कर्ज फेडीसाठी कारखान्यांनी पुढाकार घ्यावा. तसेच बँक प्रशासन व संचालक मंडळाने बँकेच्या वसुलीकडे लक्ष द्यावे, अशी सूचना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.

जिल्हा बँकेची ६४ वी सर्वसाधारण सभा शनिवारी झाली. सभेला मंत्री थोरात यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले. चेअरमन उदय शेळके, व्हाईस चेअरमन माधवराव कानवडे, संचालक अण्णासाहेब म्हस्के, भानुदास मुरकुटे, शिवाजीराव कर्डिले, अरुण तनपुरे, चंद्रशेखर घुले,

करण ससाणे, अंबादास पिसाळ, राहुल जगताप, गणपत सांगळे, प्रशांत गायकवाड, अमोल राळेभात, माजी चेअरमन बाजीराव खेमनर, रामदास वाघ, अनुराधा नागवडे, सचिन गुजर, काकासाहेब ताकपिर यांच्यासह सीईओ रावसाहेब वर्पे आदी उपस्थित होते. यावेळी मंत्री थोरात यांनी जिल्हा बँके आणि करोनामुळे सावध

होण्याची गरज, याची आठवण संचालकांना करून दिली. करोनाची काळजी घ्या. तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. नगर जिल्हा व केरळ राज्यात रुग्ण वाढ दिसून येत आहे. यामुळे दुसऱ्या वर्षी बँकेची सर्वसाधारण सभा ऑनलाईन घ्यावी लागत असल्याचे महसूल मंत्री थोरात म्हणाले.

पुढील काळाचा वेध घेवून बँकिंग क्षेत्रात काम करावे लागणार आहे. यासाठी बँकेच्या संचालकांनी अभ्यास करावा. सहकारी बँकेबाबत कायदे बदलत आहेत. त्याचाही अभ्यास करावा. विचार मंचाची स्थापना करावी. बँक शेतकऱ्यांची असून यामुळे घडणाऱ्या बदलांचा अभ्यास अगत्याचा ठरतो, असे ना. थोरात म्हणाले.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना:पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे.पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. गोपीचंद रोहिदास भोसले (वय 30...

नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्देवी घटना: दोघा सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे जलाशयावर आंघोळीसाठी गेलेल्या राजूर येथील दोन भावंडांचा रविवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी पाण्याच्या भोवर्‍यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने राजूर...

भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांना पोलिसांनी केली अटक

माय महाराष्ट्र न्यूज:कृषीपंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. या राज्य शासनाच्या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणार्‍या...

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांंच्या अडचणीत वाढ होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करीत येथील निर्भय नवजीवन फाउंडेशनचे संदीप अशोक...

महाराष्ट्रात पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

माय महाराष्ट्र न्यूज: येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत....

राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे व संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटील म्हणतात….

माय महाराष्ट्र न्यूज:संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी...
error: Content is protected !!