Saturday, October 23, 2021

नगर ब्रेकींग: शेतकऱ्यासह १३ वर्षीय मुलाचा ट्रॅक्टरखाली चिरडून मृत्यू

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :शेतामध्ये पेरणी सुरू असताना बांधावर घातल्याने झालेल्या अपघातात पेरणी यंत्रावर बसलेल्या शेतकऱ्याचा व १३ वार्षीय मुलाचा ट्रॅक्टरखाली चिरडून मृत्यू झाला वाडेगव्हाणमधील अलभरवाडी शिवारात शुक्रवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. याप्रकरणी ट्रॅक्टर चालक

जालींदर नानाभाऊ गुलदगड (वय ३८ रा. यादववाडी, तरडे मळा) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येउन त्यास अटक करण्यात आली आहे.सुपे पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार दि. २४ रोजी दुपारी जालिंदर दुलदगड हा वाडेगव्हाण शिवारातील शेतामध्ये छोटया ट्रॅक्टरने पेरणी करीत होता.

पेरणी यंत्रावर तुकाराम भिमाजी तरडे (वय वय ४८) व शुभम दत्तात्रेय तरडे (वय १३) हे बसलेले होते. पेरणी सुरू असताना दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास चालक जालिंदर याने अविचाराने ट्रॅक्टर चालवून तो बांधावर घातला.

बांधावर गेलेला ट्रॅक्टर पलटी होऊन त्याखाली तुकाराम भिमाजी तरडे व शुभम दत्तात्रेय तरडे हे चिरडले गेले. त्यातच त्यांचा दुर्देवी अंत झाला. दुर्घटनेनंतर परीसरातील नागरीकांनी घटनास्थळी धाव घेतली.

सुपे पोलिसांना त्याबाबतची माहीती देण्यात आल्यानंतर पोलिस निरीक्षक डॉ. नितिनकुमार गोकावे यांनी पोलिस कर्मचायांसह घटनास्थळी भेट दिली. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात येउन अपघातग्रस्त ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आला.

ताज्या बातम्या

वा जबरदस्त: अवघ्या 1 रुपयात खरेदी करा सोनं

माय महाराष्ट्र न्यूज:तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही 1 रुपयालाही सोने खरेदी करू शकता. डिजिटल गोल्ड हा तुमच्यासाठी चांगला पर्याय असू...

नगरचे पालकमंत्री बदलणार? या दोन नावांची चर्चा

माय महाराष्ट्र न्यूज:मंत्री हसन मुश्रीफ नगरचे पालकमंत्रीपद सोडणार या चर्चेने पुन्हा वेग घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी ते पद सोडण्याच्या विचारात...

नगर जिल्ह्यातील या भाजप आमदारांचा गंभीर आरोप ठाकरे सरकार म्हणजे ….

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यासह अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. यात शेतमालाचे मोठे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे पंचनामेही केले मात्र नुकसान भरपाई मिळालेली नाही....

राधाकृष्ण विखे पाटीलांनी दिला इशारा म्हणाले तर पळता भूई थोडी होईल 

माय महाराष्ट्र न्यूज: देशात 100 कोटी लसींचे डोस पूर्ण करण्यासाठी योगदान दिल्याबद्दल राहाता तालुक्यातील लोणी येथे आमदार राधाकृष्ण विखे-पाटलांच्या हस्ते आरोग्य सेवकांचा सत्कार करण्यात...

महाराष्ट्रातील संतापजनक घटना:वेश्या व्यावसायासाठी आईने पोटच्या मुली सोबत केले असे काही…

माय महाराष्ट्र न्यूज:आईने स्वत:च्या अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायाच्या दलदलीत ढकलले आहे. एका नातेवाईकाच्या मदतीने तिला मुंबईच्या एका दलालाला 20 लाख रुपयांना विकण्यात आले. सलग...

नगर जिल्ह्यात आजही लसीचे १ लाख १७ हजार डोस शिल्लक

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रूग्णसंख्या कमी होत आहे. दररोज १५ हजार लोकांच्या कोवीड चाचण्या  होत आहेत. असे जरी असले तरी अजून कोरोनाचा धोका...
error: Content is protected !!