Saturday, October 23, 2021

अत्यंत म्हत्वाचे:प्रार्थनागृहे, शाळा, चित्रपटगृहांबाबत काय आहेत नवे नियम? वाचा सविस्तर

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: देशातल्या कोरोना रुग्णांमध्ये घट होत असताना आता महाराष्ट्रही हळूहळू अनलॉक होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातली प्रार्थनास्थळं सात ऑक्टोबरपासून उघडण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी घेतला.

म्हणजेच, नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून आता राज्यातली मंदिरं आणि इतर प्रार्थनास्थळं दर्शनासाठी उघणार आहेत. या वेळी सर्व नागरिकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या नियमांचं पालन करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

आता दुसरी लाटही ओसरली असून, राज्यातल्या कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. त्यामुळे प्रार्थनास्थळांसोबत इतर गोष्टींवरचे निर्बंधही शिथिल करण्यात येत आहेत. राज्यात कधीपासून काय सुरू होईल याची यादी आपण पाहू या..

15 ऑगस्टपासूनच राज्य सरकारने अत्यावश्यक सेवेतले कर्मचारी आणि पूर्ण लसीकरण होऊन 14 दिवस झालेल्या व्यक्तींसाठी लोकल सेवा पूर्ववत केली आहे.

राज्यातली हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना 50 टक्के क्षमतेसह सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. यासाठी तिथे काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचं लसीकरण पूर्ण झालेलं असणं अनिवार्य आहे. अशा प्रकारे हॉटेल्स रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. पार्सल सुविधा 24 तास सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे.

अत्यावश्यक सेवांसोबतच इतर दुकानंही रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासाठी दुकानातल्या कर्मचाऱ्यांचं पूर्ण लसीकरण झालेलं असणं अनिवार्य आहे.

व्यायामगृहं, योगकेंद्रं, सलून, स्पा आणि ब्युटी पार्लर 50 टक्के क्षमतेसह सकाळी 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. दुकानातल्या कर्मचाऱ्यांचं पूर्ण लसीकरण अनिवार्य आहे.

एकूण कर्मचाऱ्यांच्या 25 टक्के क्षमतेसह कार्यालयं सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. खासगी कार्यालयांना 24 तास काम सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

कार्यालयातल्या लग्न समारंभांसाठी निमंत्रितांची मर्यादा 50 वरून वाढवून जास्तीत जास्त 100 करण्यात आली आहे. तसंच, ओपन एअर हॉलमधल्या निमंत्रितांची संख्या जास्तीत जास्त 200 पर्यंत ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

बॅडमिंटन, टेबल टेनिस, स्क्वॉश, पॅरालल बार, मल्लखांब अशा प्रकारच्या सर्व इनडोअर खेळांसाठी एकावेळी केवळ दोनच खेळाडू अशा अटीसह परवानगी देण्यात आली आहे. या ठिकाणी असणारे सर्व जण, म्हणजेच खेळाडू, प्रशिक्षक आणि कर्मचारी या सर्वांचं पूर्ण लसीकरण झालेलं असणं अनिवार्य आहे.

चार ऑक्टोबरपासून राज्यातल्या शाळाही सुरू होणार आहेत. ग्रामीण भागातले 5वी ते 12वी पर्यंतचे आणि शहरी भागातले 8वी ते 12वी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यास सरकारने परवानगी दिली आहे.यासोबतच, राज्यातली चित्रपटगृहं आणि मल्टिप्लेक्स 22 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत.

ताज्या बातम्या

वा जबरदस्त: अवघ्या 1 रुपयात खरेदी करा सोनं

माय महाराष्ट्र न्यूज:तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही 1 रुपयालाही सोने खरेदी करू शकता. डिजिटल गोल्ड हा तुमच्यासाठी चांगला पर्याय असू...

नगरचे पालकमंत्री बदलणार? या दोन नावांची चर्चा

माय महाराष्ट्र न्यूज:मंत्री हसन मुश्रीफ नगरचे पालकमंत्रीपद सोडणार या चर्चेने पुन्हा वेग घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी ते पद सोडण्याच्या विचारात...

नगर जिल्ह्यातील या भाजप आमदारांचा गंभीर आरोप ठाकरे सरकार म्हणजे ….

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यासह अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. यात शेतमालाचे मोठे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे पंचनामेही केले मात्र नुकसान भरपाई मिळालेली नाही....

राधाकृष्ण विखे पाटीलांनी दिला इशारा म्हणाले तर पळता भूई थोडी होईल 

माय महाराष्ट्र न्यूज: देशात 100 कोटी लसींचे डोस पूर्ण करण्यासाठी योगदान दिल्याबद्दल राहाता तालुक्यातील लोणी येथे आमदार राधाकृष्ण विखे-पाटलांच्या हस्ते आरोग्य सेवकांचा सत्कार करण्यात...

महाराष्ट्रातील संतापजनक घटना:वेश्या व्यावसायासाठी आईने पोटच्या मुली सोबत केले असे काही…

माय महाराष्ट्र न्यूज:आईने स्वत:च्या अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायाच्या दलदलीत ढकलले आहे. एका नातेवाईकाच्या मदतीने तिला मुंबईच्या एका दलालाला 20 लाख रुपयांना विकण्यात आले. सलग...

नगर जिल्ह्यात आजही लसीचे १ लाख १७ हजार डोस शिल्लक

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रूग्णसंख्या कमी होत आहे. दररोज १५ हजार लोकांच्या कोवीड चाचण्या  होत आहेत. असे जरी असले तरी अजून कोरोनाचा धोका...
error: Content is protected !!