Tuesday, November 30, 2021

नगर विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपाकडून या नावांची जोरदार चर्चा……

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:नगर विधान परिषदेची निवडणूक अद्याप जाहीर झालेली नसली तरी इच्छूक उमेदवारांच्या नावाची चर्चा सध्या सुरु झालेली आहे. भाजपाकडून अनेकजण सध्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी इच्छूक असले तरी कार्यकर्त्यांमधून

भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनाच पक्षाने उमेदवारी द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. प्रा. बेरड यांनी केलेल्या प्रामाणिक कामाचे फळ विधान परिषदेचे तिकिट देऊन द्यावे, अशी अपेक्षा सर्वसामान्य कार्यकर्त्यांमधून व्यक्त केली जात आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीला अजून अवधी असला तरी इच्छुकांनी आतापासून मोर्चेबांधणी सुरु केलेली आहे. काहींनी तर मतदारांना आपल्याकडे कसे आकर्षित करण्यात येईल, या दृष्टीने प्रयत्न सुरु केलेले आहे. काही खास लोकांना पाठवून मतदारांना सहली घडवून आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.

काहींनी तर उमेदवारी आपल्यालाच मिळेल, अशी आशा धरलेली आहे. यामध्ये राष्ट्रवादी व भाजपाच्या नेत्यांचा समावेश आहे.मात्र भाजपामध्ये विधान परिषदेसाठी माजी पालकमंत्री राम शिंदे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांची नावे चर्चेत आहेत.

परंतु या सर्वांना पक्षाने अनेक संधी दिलेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या ऐवजी आता पक्षाशी एकनिष्ठ असलेले व पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणारे प्रा. भानुदास बेरड यांना आता विधान परिषदेची संधी देण्यात यावी, अशी अपेक्षा सर्वसामान्य कार्यकर्त्यांमधून व्यक्त केली जात आहे.

भानुदास बेरड यांनी भाजपाच्या जिल्हाध्यक्षाची जबाबदारी असताना जिल्ह्यात पक्षाचे चांगले संघटन उभे केलेले आहे. त्यामुळे जिल्ह्यात पक्षाची बांधणी चांगली झालेली असून सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत ते पोहचलेले असून त्यांनी कार्यकर्त्यांसह सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत.

त्यामुळे जिल्ह्यात भाजपाची चांगली फळी निर्माण झालेली आहे.बेरड यांनी केलेल्या कामाचे फळ आता पक्षाने त्यांना द्यावे, अशी अपेक्षा सर्वसामान्य कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे. तशा आशयाचा पोस्ट आता काहीजण सोशल मीडियावर टाकून पक्षाच्या नेत्यांच्या ही बाब निदर्शनात आणून देत आहे.

बेरड यांनाच पक्षाने विधान परिषदेची उमेदवारी द्यावी, यासाठी समर्थन केले जात आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना:पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे.पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. गोपीचंद रोहिदास भोसले (वय 30...

नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्देवी घटना: दोघा सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे जलाशयावर आंघोळीसाठी गेलेल्या राजूर येथील दोन भावंडांचा रविवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी पाण्याच्या भोवर्‍यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने राजूर...

भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांना पोलिसांनी केली अटक

माय महाराष्ट्र न्यूज:कृषीपंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. या राज्य शासनाच्या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणार्‍या...

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांंच्या अडचणीत वाढ होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करीत येथील निर्भय नवजीवन फाउंडेशनचे संदीप अशोक...

महाराष्ट्रात पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

माय महाराष्ट्र न्यूज: येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत....

राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे व संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटील म्हणतात….

माय महाराष्ट्र न्यूज:संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी...
error: Content is protected !!