Friday, December 3, 2021

पेट्रोल स्थिर, डिझेलचे दर वाढले; पाहा आजचे दर

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीने सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. खाद्य तेलापासून ते सर्वसामान्याच्या खाद्यातील डाळी पर्यंत महागाई जाणवू लागली आहे. तीन आठवड्यांपासून पेट्रोलच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही.

एक ते पाच सप्टेंबर दरम्यान पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दोन वेळा कपात करण्यात आली होती.पेट्रोलच्या किंमतीमध्ये मागील 21 दिवसांपासून कोणताही बदल झालेला नाही. मात्र, डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ झालेली आहे. रविवारी देशभरात डिझेलच्या किंमतीत प्रति लीटर

23 ते 27 पैशांनी वाढ झाली आहे. इंडियन ऑयल कॉर्पोरेशन (IOCL) नुसार, आज म्हणजेच 26 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत प्रतिलीटर 101.19 रुपये आहे. तर डिझेलच्या दरांत प्रतिलीटर 25 पैशांनी वाढ होऊन 89.07 रुपये इतकी झाली आहे.

 यावेळी प्रतिलीटर 15-15 पैशांनी किंमत कपात करण्यात आली होती. सप्टेंबरमध्ये पेट्रोल आणि डिझेलमध्ये 30 पैशांनी घसरण झाली होती. पण त्यानंतर तीन आठवडे इंधन दरांमध्ये कोणताही बदल झाला नव्हता. 24 सप्टेंबर रोजी डिझेलच्या दरांत प्रतिलीट 20 पैशांनी वाढ झाली.

त्यानंतर दोन दिवस दर स्थिर राहिले. मात्र, आज, 26 सप्टेंबर रोजी डिझेल पुन्हा प्रतिलीटर 25- 27 पैशांनी महागलं. प्रमुख शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर -इंडियन ऑयल कॉर्पोरेशन (IOCL) नुसार, राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत प्रतिलीटर 101.19 रुपये आहे.

तर डिझेलच्या दरांत प्रतिलीटर 25 पैशांनी वाढ होऊन 89.07 रुपये इतकी झाली आहे. मुंबईत डिझेलच्या दरांत प्रतिलीटर 27 पैशांनी वाढ झाली आहे. मुंबईती डिझेलचा दर प्रतिलीटर 96.68 रुपये इतका झाला आहे. तर पेट्रोल 107.26 रुपये प्रतिलीटर इतकं झालं आहे. भोपाळमध्ये पेट्रोल प्रतिलीटर 109.63 रुपये

तर डिझेल प्रतिलीटर 97.92 रुपये झालं आहे. तर जम्मू काश्मीरमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रतिलीटर अनुक्रमे 100.53 आणि 89.71 रुपये इतके आहेत. चेन्नईमध्ये पेट्रोल 103.79 रुपये प्रति लीटर आहे तर डिझेल प्रतिलीटर 95.10 रुपये आहे. रांचीमध्ये पेट्रोल प्रतिलीटर 96.21 रुपये तर डिझेल प्रतिलीटर 94.05 रुपये आहे.

दररोज सकाळी सहा वाजता बदलतात किंमती आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती दररोज बदलत असतात. त्यानुसार दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये बदल होतात. सकाळी सहा वाजल्यापासून नव्या किंमती लागू केल्या जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या

 दरांमध्ये एक्साइज ड्यूटी, डीलर कमीशन आणि इतर गोष्टींसह या पेट्रोलचे भाव जवळपास दुप्पट होतात. परकीय चलनांसहित आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलच्या किंमती काय आहेत या आधारावर दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये बदल होतात.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!