Friday, December 3, 2021

नगर ब्रेकिंग:माजी नगरसेवकासह तिघांवर गुन्हा दाखल ; जिल्ह्यात खळबळ

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड , कर्जत या दुष्काळी तालुक्यांना खासगी सावकारकीचा वेढा पडला आहे. अशातच आता येथिल एका माजी नगरसेवकासह तीघांवर सावकारकीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यांनी कर्जदाराचा छोटा हत्ती हे चारचाकी वाहन व दुचाकी बळजबरीने ओढून नेली असल्याचे समोर आले आहे.

संदीप सुरेश गायकवाड असे माजी नगरसेवकाचे नाव असून शेखर बाळू रिटे (दोघे रा. गोरोबा टाकी, जामखेड) त्यांच्या इतर एका साथीदारालाही पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी जामखेड तालुक्यातील पिंपळगाव आवळा येथिल अशोक दत्ता बोबडे (वय 22 वर्षे ) यांनी तक्रार दाखल केली आहे.

त्यांनी गायकवाड यांच्याकडून 1 लाख रूपये घेतले होते. 23 सप्टेंबरला अचानक घरी येऊन गायकवाड यांनी कर्जाची रक्कम लगेच मागीतली. परंतु रक्कम देण्यास फिर्यादी अशोक बोबडे यांनी असमर्थता दाखवत दोन दिवसात पैसे देण्याचे अश्वासन दिलेे.

मात्र संशयितांनी त्याचे ऐकून न घेता त्यांचा दिड लाख रूपये किंमतीचा टाटा कंपनीचा छोटा हत्ती नंबर (एम एच 16 सी सी 2239) व अंदाजे 50 हजार रूपये किंमतीची हरो कंपनीची स्प्लेंडर मॉडेलची मोटर सायकल (एम एच 16 सी आर 9008) यांच्या चाव्या बळजबरीने काढून घेऊन गेले.

त्यानंतर गायकवड यांनी बोबडे यांच्या आई वडिलांकडून सर्व कुटुंबियांचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड घेऊन गेले त्याचा दुरुपयोग होण्याची शक्यता असल्याने बोबडे यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.याप्रकरणी गायकवाड व इतर दोघांवर भा.द.वि. कलम 327, 34 प्रमाणे महाराष्ट्र सावकारी

अधिनियम कायदा कलम 39 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास जामखेड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुनील बडे हे करत आहेत.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!