Friday, December 3, 2021

जायकवाडीचा उपयुक्त साठा तब्बल इतक्या टक्क्यांवर

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:पावसाने उघडीप दिल्याने धरणांमधून विसर्ग कमी प्रमाणात सुरु आहेत. गोदावरीच्या विसर्गातही कधी खंड तर कधी सुरु! अशी स्थिती आहे. काल गोदावरीतून 1614 क्युसेकने विसर्ग जायकवाडीच्या दिशेने सुरु होता तर प्रत्यक्ष जायकवाडी जलाशयात इतर ठिकाणचेही पाणी दाखल होत

 या धरणात 10 हजार 344 क्युसेकने आवक सुरु होती. त्यामुळे काल सायंकाळी 6 वाजता जायकवाडीचा उपयुक्तसाठा 80 टक्क्यांपर्यंत पोहचला आहे.यंदा गोदावरीतून जायकवाडीच्या दिशेने 15.6 टिएमसी पाण्याचा विसर्ग झाला आहे.

जायकवाडीत यंदा 40.9 टिएमसी नवीन पाणी दाखल झाले. त्यामुळे नांदूरमधमेश्वर ते जायकवाडी जलाशय या अंतरातील ओढे, नाल्यांचे पाणी, प्रवरेतील काही अंशी पाणी आणि गंगापूर, वैजापूर तालुक्यातील छोट्या छोट्या नद्या, नाले, ओढे यातील पाणी, आणि जायकवाडीच्या मुक्त पाणलोटातील पाणी

मोठ्या प्रमाणात दाखल झाल्याने यंदा जायकवाडीत चांगले पाणी दाखल झाले.काल सकाळी मागील 24 तासात जायकवाडी जलाशयात 1.3 टिएमसी नवीन पाणी दाखल झाले. त्यामुळे काल सायंकाळी 6 च्या आकडेवारी नुसार 79.73 टक्के पाणीसाठा झाला होता.

हा उपयुक्तसाठा 80 टक्क्यांच्या जवळपास आहे. अजुनही पावसाचा अंदाज जाणकार व्यक्त करत असल्याने या जलाशयातील साठा अजुन फुगणार आहे.दि. 29 सप्टेंबरला बंगालच्या उपसागरात निर्माण होत असलेले दुसरे चक्रीय वादळ ओरिसातून ग्वाल्हेर पर्यंत जाऊन परत दि. 3 ऑक्टोबरच्या

 दरम्यान परत मागे फिरेल. त्यामुळे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवट्यात मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु होईल.

उत्तमराव निर्मळ, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!