Saturday, November 27, 2021

एसटी महामंडळात दहावी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:दहावी पास असणाऱ्यांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. एमएसआरटीसीने प्रशिक्षणार्थी पदासाठी अर्ज मागविले आहेत. रत्नागिरी विभागामार्फ मार्फत प्रशिक्षणार्थी भरती सुरु आहे. या अंतर्गत डिझेल मेकॅनिक या पदाची रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, पगार, प्रशिक्षण कालावधी याचा तपशील वेबसाइटवर देण्यात आला आहे. उमेदवारांना यासाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. स्किल इंडिया अंतर्गत येणाऱ्या अप्रेंटिसशिप इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरती २०२१ अंतर्गत डिझेल मेकॅनिक या पदाच्या ५० रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी दहावी पास असणारे उमेदवार अर्ज करु शकतात.

प्रशिक्षणार्थी पदाचा कालावधी
ऑटोमोबाइल सेक्टरमधील डिझेल मॅकेनिक पदाचा प्रशिक्षणार्थी कालावधी २५ महिन्यांचा असेल. त्यातील ६ महिने बेसिक ट्रेनिंगचे असतील. तर कामावरील प्रशिक्षण कालावधी १९ महिन्यांचा असेल.

उमेदवारांना प्रशिक्षण कालावधीमध्ये ६ हजार ते ७, ६१५ रुपये मानधन दिले जाईल. इतर कोणताही भत्ता दिला जाणार नाही. आठवड्यातील ६ दिवस काम असणार आहे

अर्ज करण्याचा पत्ता:
या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी डिव्हीजनल कंट्रोलर कार्यालय, माळनाका,तालुका आणि जिल्हा रत्नागिरी.पिन कोड-४१५६१२ या पत्त्यावर आपला अर्ज पाठवायचा आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात एकच खळबळ:काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी...

बापरे : पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय

माय महाराष्ट्र न्यूज: पोलिसांनी मानवी तस्करीचा भांडाफोड केला आहे. हे तस्कर बांग्लादेशातून तरुणी आणून भारतात देह व्यापाराच्या व्यवसायाता ढकलत होते. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह 8...

मोठी बातमी:महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली?आज अमित शहा, देवेंद्र फडणवीस व शरद पवार दिल्लीत भेट ?

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक नेते...

धक्कादायक :महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ...

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. तिसरी लाट जरी आली तरी अतिशय सौम्य प्रमाणात असल्याचा दावा राज्याचे...

नगर जिल्हा रुग्णालय :१४ जणांचा बळी घेणारी आग कशी लागली? अहवाल तयार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. सुमारे ६५...
error: Content is protected !!