Friday, December 3, 2021

कोविशील्ड लसीबद्दल एक म्हत्वाची बातमी समोर

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:देशात कोरोनाने थैमान घातलं होतं. दुसऱ्या लाटेचा अनेकांना फटका बसला. कोरोनाचा धोका टाळण्यासाठी देशात लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे. लसीकरण सुरू असल्याने आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळतोय.

पण नव्या व्हेरिएंटमुळे चिंता अजून कायम आहे. अशातच कोविशील्ड लसीबद्दल एक चांगली बातमी समोर आली आहे.कोरोना लसीकरणात सर्वाधिक वापर कोविशील्ड लसीचा केला जातोय. सीरम इन्स्टिट्युटने तयार केलेली कोविशील्डची लस देशभरात कोट्यवधी लोकांनी घेतली आहे. दरम्यान कोविशील्डचे

 दोन डोस घेतल्यानंतर अँटिबॉडीज किती काळ शरीरात राहतात, हे तपासण्यासाठी बंगळुरूतील श्री जयदेव इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओव्हॅस्क्युलर सायन्सेस अँड रिसर्चने एक अभ्यास केला.या अभ्यासातून एक अतिशय दिलासादायक गोष्ट समोर आलीये. कोविशील्डचे दोन्ही डोस घेतल्यावर 6 महिन्यांनंतरही 99 टक्के व्यक्तींच्या शरीरात अँटीबॉडीज टिकून असल्याची माहिती सर्वेक्षणातून पुढे आली.

या अभ्यासामध्ये लसीकरण पूर्ण झालेल्या 250 आरोग्य कर्मचाऱ्यांच्या शरीरातील अँटीबॉडीज तपासण्यासाठी सर्वेक्षणात केलं असल्याची माहिती जयदेवचे संचालक डॉ. सी. एन. मंजुनाथ यांनी दिलीये.

डॉ. मंजुनाथ म्हणाले, “आम्ही 250 जणांच्या शरीरातील अँटीबॉडीज तपासून पाहिल्या गेल्या. दोन्ही डोस घेऊन 6 महिने पूर्ण झाल्यावर 99 टक्के व्यक्तींच्या शरीरात अँटीबॉडीज कायम असल्याची माहिती सर्वेक्षणातून समोर आली. त्यामुळे सध्याच्या काळात बूस्टर डोसची गरज नाही असं आपण म्हणू शकतो.”

या अभ्यासात सहभागी झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी महिन्यात कोविशील्डचा दुसरा डोस देण्यात आला होता. एप्रिलमध्ये या सर्वांचं सर्वेक्षण करण्यात आलं. त्यावेळी 79 टक्के व्यक्तींच्या शरीरातील रोगप्रतिकारशक्तीने पॉझिटीव्ह प्रतिसाद दिला. तर बाकी 21 टक्के व्यक्तींच्या शरीरातील रोगप्रतिकारशक्तीने निगेटीव्ह प्रतिसाद दिला होता

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!