Wednesday, December 8, 2021

अत्यंत म्हत्वाचे: आता यांना मिळणार नाही मोबाईल सिमकार्ड

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:मागील काही वर्षांमध्‍ये मोबाईल फोन हा आपल्‍या जगण्‍यातला अभिवाज्‍य भाग झाला आहे. कोरोना काळापासून तर मुलांच्‍या शाळेपासून ज्‍येष्‍ठ नागरिकांचा औषधांपर्यंत अशा विविध कारणांसाठी मोबाईल फोनचा वापर हा अनिवार्य झाला.

आता दूरसंचार विभागाने मोबाईल सिम कार्ड विक्री संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. आता मोबाईल सिम कार्ड घेण्‍यासाठी ग्राहकांसाठी नियम करण्‍यात आले आहेत.ग्राहकांना सिम कार्ड घेताना ग्राहक फॉर्म ( सीएएफ ) भरावा लागतो. ग्राहक आणि टेलिकॉम कंपनीमधील हा एक प्रकारचा करारच असतो.

आता या फॉर्ममध्‍ये काही बदल करण्‍यात आले आहेत.यासंदर्भात दूरसंचार विभागाने म्‍हटले आहे की, आता देशात अल्‍पवयीन मुलांना मोबाईल सिम कार्ड देण्‍यात येणार नाही. यामुळे आता १८ वर्ष पूर्ण झालेल्‍यांनाच सिम कार्ड दिले जाणार आहे.

कोणत्‍याही टेलिफोन कंपनीला आपल्‍या ग्राहकांना सिम कार्ड देताना १८ वर्ष पूर्ण असणार्‍या ग्राहकांनाच सिम कार्ड देण्‍याची परवानगी असणार आहे.त्‍यामुळे यापुढे अल्‍पवयीन मुलांना सिम कार्डची विक्री करणे ही अवैध विक्री मानली जणार आहे.

 वयोगटाबरोबरच मानसिक स्‍थितीचाही होणार विचारनवीन सिम कार्ड खरेदी करणार्‍या ग्राहकाला ‘सीएएफ’ फॉर्म भरावा लागतो. आता यामध्‍ये बदल करण्‍यात आला आहे.१८ वर्षाखालील मुलांना सिम कार्ड विक्री करता येणार नाही, असे नवीन नियमांमध्‍ये स्‍पष्‍ट करण्‍यात आले आहे.त्‍याचबरोबर ग्राहकाची मानिसिक स्‍थिती बिघडली असेल तरीही सिम कार्ड विक्री करता येणार नाही.

आता सिम कार्ड खरेदीसाठी डिजिटल ‘केवायसी’ होणार आहे. ग्राहकाला आता टेलिफोन कंपनीच्‍या ॲपवरुन स्‍वत:च केवायसी करु शकेल. यासाठी ग्राहकाला एक रुपया शुल्‍क द्‍यावे लागेल.

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!