Wednesday, December 8, 2021

या’ ठिकाणी सापडला कोरोनाचा धोकादायक व्हेरिएंट

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:जगभरात कोरोना व्हायरसचा कहर पुन्हा एकदा वाढताना दिसतोय. कोविड 19 ची प्रकरणं अनेक देशांमध्ये झपाट्याने वाढत असल्याचं चित्र आहे. भारतात कोरोना विषाणूच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचाही इशारा देण्यात आला आहे.

त्यातच आता कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रकरणांमध्ये एक भीतीदायक बातमी समोर आली आहे. कोविड 19चा सर्वात धोकादायक व्हेरिएंट अमेरिकेत सापडला आहे. त्याचं नाव R.1 व्हेरिएंट आहे.

जगभरात R.1 व्हेरिएंटचे रुग्ण कमी असले तरी त्याचा धोका जास्त आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाला दीड वर्षांहून अधिक काळ उलटला आहे आणि जगभरात लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना विषाणूच्या या धोकादायक व्हेरिएंटबद्दल तज्ज्ञांनी लोकांना सावध केलं आहे. संशोधकांनी अलीकडेच अमेरिकेत कोरोनाचं रूप R.1 ओळखलं आहे. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, R.1 व्हेरिएंटच्या रूग्णांची कमी संख्या असूनही निष्काळजीपणा करता येणार नाही. हे धोकादायक सिद्ध होऊ शकतं.

तज्ज्ञांच्या मते, R.1 व्हेरियंट अमेरिकेतील संशोधकांनी नुकतंच ओळखला असला, तरी हा व्हेरिएंट जपानमध्ये गेल्या वर्षी सापडला आहे. या व्यतिरिक्त, R.1 व्हेरिएंट इतर अनेक देशांमध्येही सापडला आहे. जाणून घ्या की, कोरोनाच्या व्हेरिएंट R.1 ची प्रकरणं अमेरिकेसह जगातील सुमारे 35 देशांमध्ये आढळली आहेत. त्यांची संख्या 10 हजाराहून अधिक आहे.

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!