Tuesday, November 30, 2021

रुपाली चाकणकर भडकल्या, म्हणाल्या, ‘हा माज तुमच्या घरी दाखवा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:पुण्यातील भाजप आमदाराची एका महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ करतानाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. अतिशय अर्वाच्य भाषेत भाजप आमदार महिला अधिकाऱ्याला बोलत असल्याचं ऑडिओ क्लिपमधून ऐकायला मिळतंय.

याच व्हायरल व्हिडीओ क्लिपवरुन राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भाजप आमदारावर हल्लाबोल केलाय. भाजपा आमदारानं हा माज आपल्या घरी दाखवावा, मनपाचे कर्मचारी तुमचे नोकर नाहीत, अशा शब्दात त्यांनी भाजप आमदाराचा समाचार घेतलाय.

व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप राज्याच्या माजी सामाजिक न्यायमंत्र्यांच्या आमदार भावाची असल्याचं अनेक जण म्हणत आहेत. रुपाली चाकणकरांनी देखील त्यांचंच नाव घेत जोरदार टीका केली आहे. पुणे मनपाचे कर्मचारी कुणाचे नोकर नाहीयत.

झालेल्या प्रकाराविरोधात महिला अधिकाऱ्याने तक्रार दाखल करावी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी उभा राहिल, अशी ग्वाही यानिमित्ताने चाकणकरांनी दिली आहे.भाजपा आमदारानं हा माज आपल्या घरी दाखवावा, हे पुणे मनपाचे कर्मचारी आहेत कोणाचे नोकर नाहीयत, किंवा कोणच्या पक्षाचे कार्यकर्तेही नाहीयत.

भाजपच्या असंस्कृतपणाच्या चिखलात अशीच कमळं उगवणार, अशी टीकाही त्यांनी केलीय. आमदारांनी त्वरित माफी मागावी अशी मागणीही त्यांनी केलीय. संघाचे संस्कार तुम्ही दाखवून दिलेत. पण आता झाल्या प्रकाराबद्दल महिला अधिकाऱ्याची आणि तमाम महिला वर्गाची तुम्ही माफी मागितली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केलीय.

पुणे महापालिकेतील कामाच्या लॉकिंग बिलासंदर्भात आमदारांनी महिला अधिकाऱ्याला फोन केला. बिलं काढता की नाही, काय करता ते सांगा? नाहीतर तुमच्याकडे बघून घेतो, असं म्हणत महिला अधिकाऱ्याला आमदारांनी धमकाविण्याचा प्रयत्न करत अतिशय गलिच्छ भाषेत शिवीगाळ केली.

“किती वेळा त्याने तुमच्याकडे यायचं, काम होणार आहे की नाही, नसेल तर तसं सांगा, मी बघतो मग काय करायचं?”, असं आमदार तावातावाने अधिकाऱ्याला म्हणत आहे. त्यावर महिला अधिकारी तुम्ही आमच्या साहेबांना फोन करा, असं सांगतात.

त्यावर मी काय तुमचा नोकर आहे का?, तुम्ही तुमच्या साहेबाला फोन करा, आणि मला परत 10 मिनिटांत फोन करा, असं आमदार म्हणतात.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना:पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे.पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. गोपीचंद रोहिदास भोसले (वय 30...

नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्देवी घटना: दोघा सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे जलाशयावर आंघोळीसाठी गेलेल्या राजूर येथील दोन भावंडांचा रविवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी पाण्याच्या भोवर्‍यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने राजूर...

भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांना पोलिसांनी केली अटक

माय महाराष्ट्र न्यूज:कृषीपंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. या राज्य शासनाच्या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणार्‍या...

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांंच्या अडचणीत वाढ होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करीत येथील निर्भय नवजीवन फाउंडेशनचे संदीप अशोक...

महाराष्ट्रात पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

माय महाराष्ट्र न्यूज: येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत....

राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे व संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटील म्हणतात….

माय महाराष्ट्र न्यूज:संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी...
error: Content is protected !!