Saturday, November 27, 2021

1 ऑक्टोबरपासून नाही चालणार जुनं चेकबुक अन्यथा मोठं नुकसान

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:ऑक्टोबर महिन्यात आधीच बँक 21 दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे अनेक कामं रखडण्यापूर्वीच ती लवकरात लवकर पूर्ण करून घेणं गरजेचं आहे. अनेक मोठे व्यवहार हे चेकद्वारे केले जात असतात. अशा व्यववहार करणाऱ्यांसाठी आणि ज्यांच्याकडे चेकबुक आहे अशा लोकांसाठी सर्वात मोठी बातमी आहे.

तुमचं चेकबुक जर जुनं झालं असेल तर ते तातडीनं बदलून घ्यावं लागणार आहे.जुनं झालेलं चेकबुक 1 ऑक्टोबरपासून चालणार नाही. त्यामुळे तुमचं नुकसान होण्याची शक्यता आहे. देशातील मोठ्या 3 सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे चेकबुक आता कामास येणार नाही आहे.

जर तुमचे खाते देखील या बँकांमध्ये असेल तर लगेच चेकबुक बदलावे लागणार आहे. या अशा तीन बँका आहेत ज्या नुकत्याच इतर बँकांमध्ये विलीन झाल्या आहेत. बँकांच्या विलीनीकरणामुळे, खातेधारकांच्या आयएफएससी आणि एमआयसीआर कोडमधील बदलांमुळे 1 ऑक्टोबर 2021 पासून बँकिंग

सिस्टिम जुने चेकबुक स्वीकारणार नाही असं सांगितलं जात आहे.1 ऑक्टोबरपासून 3 बँकेतील ग्राहकांचे चेकबुक आऊटडेटेड होणार आहेत. त्यामुळे तुम्ही जर या बँकेचे ग्राहक असाल तर येत्या 4 दिवसांमध्ये आपलं चेकबुक नवीन घ्या. नाहीतर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. 1 ऑक्टोबरपासून अलाहबाद बँक,

ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांचं जुनं चेकबुक चालणार नाही. ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया या दोन्ही बँका पंजाब नॅशनल बँकमध्ये विलीन झाल्या आहेत. तिन्ही बँकांनी आपल्या ट्वीटरवरून यासंदर्भात माहिती दिली आहे. 30 सप्टेंबरपर्यंत तिन्ही बँकांचे जुने

चेकबुक आणि MICR कोड चालणार आहेत. त्यानंतर मात्र ते इनव्हॅलिड होतील असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे कोणत्याही व्यत्ययाशिवाय तुम्हाला व्यवहार करायचे असतील तर चेकबुक नवीन घ्यावं लागणार आहे. 1 ऑक्टोबरपूर्वीच नवीन चेकबुक घ्या असं आवाहन सर्व बँकेच्या ग्राहकांना करण्यात आलं आहे.

तिन्ही बँकेचा MICR कोड हा 1 ओक्टोबरनंतर ग्राह्य धरला जाणार नाही असं सांगण्यात आलं आहे. तुमच्या जवळच्या बँकेतून तुम्ही चेकबुक घेऊ शकता. याशिवाय इंटरनेट बँकिंगच्या मदतीनं किंवा मोबाईल बँकिंगच्या मदतीनं तुम्ही चेकबुकसाठी अप्लाय करू शकता. ऑनलाइन बँकिंग व्यवहाराची सुविधा वापरण्यासाठी या बँकांच्या खातेदारांना विलीनीकरणानंतरच्या

 नियमांनुसार त्यांचा जुना IFSC कोड बदलणे आवश्यक असेल. म्हणजेच, जर तुम्ही या बँकांचे ग्राहक असाल, तर सर्व अपडेट लगेच करा.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात एकच खळबळ:काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी...

बापरे : पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय

माय महाराष्ट्र न्यूज: पोलिसांनी मानवी तस्करीचा भांडाफोड केला आहे. हे तस्कर बांग्लादेशातून तरुणी आणून भारतात देह व्यापाराच्या व्यवसायाता ढकलत होते. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह 8...

मोठी बातमी:महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली?आज अमित शहा, देवेंद्र फडणवीस व शरद पवार दिल्लीत भेट ?

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक नेते...

धक्कादायक :महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ...

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. तिसरी लाट जरी आली तरी अतिशय सौम्य प्रमाणात असल्याचा दावा राज्याचे...

नगर जिल्हा रुग्णालय :१४ जणांचा बळी घेणारी आग कशी लागली? अहवाल तयार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. सुमारे ६५...
error: Content is protected !!