Wednesday, December 8, 2021

संजय राऊतांचे खळबळजनक विधान: अजित दादांनी ऐकलं तर बरं नाहीतर

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:शिवसेनेत पक्षामध्ये निष्टेला महत्व आहे. पद येतात जातात- सत्ता येते जाते. निष्टा कायम राहायला हवी. पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत भोसरीतून शिवसनेचा एकही नगरसेवक निवडुन आलेला नाही याची आपल्याला खंत आहे.

भोसरीने साथ दिली असती तर आढळराव पाटील देखील आज लोकसभेत असते. असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले. ते भोसरी (पिंपरी-चिंचवड)येथे कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. 55 ला आमचा मुख्यमंत्री होतो तर किमान 40 -45 ला पिंपरी चिंचवडचा महापौर व्हायला हवा. महाविकास आघाडी आहे.

सर्वांना थोडं थोडं मिळालं पाहिजे त्यात शिवसेनेलाही मिळालं पाहिजे. पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेनेचा महापौर असला पाहिजे असं आपण म्हटलं तर चूकलं काय? परंतु या दोन्ही शहरांमध्ये शिवसनेचा भगवा फडकला नाही याची खंत आहे. दोन्ही शहरांमध्ये उद्याचा भविष्यकाळ शिवसेनेचा असला पाहिजे. असंही संजय राऊत यांनी म्हटले.

‘राज्यात सत्ता असली तरी या भागात आपलं ऐकत नाही असं म्हणतात. पण असं नाहीये. अजितदादा देखील मुख्यमंत्र्यांचं ऐकतात. त्यामुळे आपण त्यांना सांगू. दादांनी ऐकले तर बरं होईल. नाहीतर आज मुख्यमंत्री आज दिल्लीत गेलेच आहेत.’ अशी मिश्किल टिप्पणी देखील राऊत यांनी केली आणि ते पुढे म्हणाले, ‘मुख्यंमंत्री दिल्लीचा अंदाज घ्यायला गेले आहेत. उद्या दिल्लीवरही आम्हाला राज्य करायचं आहे.’

पिंपरी चिंचवड शहरात आपला पाया ढेपाळला आहे. आपली संघटनात्मक बांधणी मजबूत झाली पाहिजे. महाआघाडी होईल किंवा नाही. तुम्ही त्याचा विचार करू नका. आपण सर्व जागांसाठी जोरदार प्रयत्न करू. झाली आघाडी तर सोबत नाहीतर शिवाय अशी भूमिका आपली आहे. आपण सन्मानाने आघाडी

 करण्याचा प्रयत्न करू, परंतु स्वाभिमान सोडून भगव्या झेंड्याशी आपण तडजोड करणार नाही हे लक्षात घ्यावं. असंही राऊत यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हटले.

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!