Saturday, November 27, 2021

महाविकासआघाडी सरकारमधील आणखी एका मंत्र्याचा घोटाळा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:माजी आमदार तथा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी मागास प्रवर्ग मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर अडीच कोटी रुपयांचा घोटाळा केला असल्याचा आरोप केल्याने एकचं खळबळ उडाली आहे. वडेट्टीवार यांना हा घोटाळा पचवू देणार नाही, या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी

 अन्यथा महाज्योती कार्यालयावर विद्यार्थी मोर्चा काढणार असल्याचा इशारा देखील शेंडगे यांनी दिला. शेंडगे हे उस्मानाबाद येथे ओबीसी आरक्षणसाठी बैठक घेण्यासाठी आले होते त्यांनतर त्यांनी हे आरोप केले.

४ वर्षापूर्वी बंद पडलेल्या कंपनीला ओबीसी विद्यार्थीना विमान चालविण्याचे प्रशिक्षणाचे काम दिले.नागपूर फ्लाईग क्लबला अडीच कोटी देऊन ६ महिने झाले तरी एकाही विद्यार्थ्याला प्रशिक्षण दिले गेले नाही. कारण, नागपूर येथील नागपूर फ्लाईंग क्लब या ४ वर्षापूर्वी बंद पडलेल्या कंपनीला ओबीसी विद्यार्थीना

 विमान चालविण्याचे प्रशिक्षणाचे काम दिले. बंद पडलेल्या या प्रशिक्षण कंपनीकडे स्वतःचे विमान नाही , प्रशिक्षक नाही तर व्यावसायिक म्हणजे कमर्शिअल पायलट ट्रेनिंग देण्याचा परवाना नाही तरी अडीच कोटी दिले गेले असा आरोप त्यांनी केला.

१७ जून २०१७ पासून प्रशिक्षण देणारा नागपूर क्लब बंद आहे त्याचबरोबर त्यांच्याकडे मनुष्यबळ नाही, विमान, प्रशिक्षक नाहीत. ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना विमान चालविण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी योजना तयार केली व करोडो रुपये दिले गेले मात्र एकाही विद्यार्थ्याला अद्याप प्रशिक्षण दिले गेले नाही

 त्यामुळे विद्यार्थ्यांची ससेहोलपालट होत आहे. बहुजन कल्याण मंत्रालय अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजेच महाज्योती सुरू केली आहे. महाज्योतीचे संचालक स्वतः या संस्थेचे अध्यक्ष वडेट्टीवार यांचा राजीनामा मागत नवीन अध्यक्ष देण्याची मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे करीत आहेत.

शेंडगे यांनी आरोप केल्याने महाज्योतीची विमान प्रशिक्षण योजना व मंत्री वडेट्टीवार वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. दरम्यान, मंत्री वडेट्टीवार नागपूरचे, महाज्योतीचे कार्यकारी संचालक डांगे हेही नागपूरचे तर प्रशिक्षण देणारी कंपनी नागपूरची त्यामुळे हे सगळे साटेलोटे केले आहे. हा विमान प्रशिक्षण घोटाळा त्यांना पचवू देणार नाही असे शेंडगे म्हणाले.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात एकच खळबळ:काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी...

बापरे : पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय

माय महाराष्ट्र न्यूज: पोलिसांनी मानवी तस्करीचा भांडाफोड केला आहे. हे तस्कर बांग्लादेशातून तरुणी आणून भारतात देह व्यापाराच्या व्यवसायाता ढकलत होते. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह 8...

मोठी बातमी:महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली?आज अमित शहा, देवेंद्र फडणवीस व शरद पवार दिल्लीत भेट ?

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक नेते...

धक्कादायक :महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ...

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. तिसरी लाट जरी आली तरी अतिशय सौम्य प्रमाणात असल्याचा दावा राज्याचे...

नगर जिल्हा रुग्णालय :१४ जणांचा बळी घेणारी आग कशी लागली? अहवाल तयार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. सुमारे ६५...
error: Content is protected !!