Tuesday, November 30, 2021

चक्रीवादळाचा महाराष्ट्राला धोका; या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:महाराष्ट्रातून कोरोनाची दुसरी लाट आता ओसरत चालली आहे. व्हायरसची आपत्ती संपत नाही तोच आता नैसर्गिक आपत्ती समोर आ वासून उभी राहिली आहे. या नैसर्गिक आपत्तीचं नाव आहे गुलाब चक्रीवादळ. गुलाब चक्रीवादळ हे बंगालच्या उपसागरात दाखल झाले आहे.

त्यामुळे आंध्र प्रदेश, ओरीसा किनारपरट्टीला चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे. तर महाराष्ट्रात पुढील चार दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याआधी आलेल्या तौक्ते वादळाचा फटका आपण पाहिलाच आहे. आता गुलाब या वादळाचा फटका महाराष्ट्राला कसा बसणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महाराष्ट्रातल्या विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडणार आहे. तर कोकणात 26 ते 28 सप्टेंबर या कालावधीत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस कोसळेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

27 सप्टेंबर : औरंगाबाद आणि जालना या दोन जिल्हयांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

28 सप्टेंबर : नंदुरबार, धुळे, जळगाव, रायगड आणि रत्नागिरी या जिल्हयांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

26 सप्टेंबर : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल. विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.

27 सप्टेंबर : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल. विदर्भात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल.

हवामान खात्यानं या वादळाला गुलाब असं नाव दिलं आहे. शनिवार आणि रविवार असे दोन दिवस हे चक्रीवादळ सक्रीय राहिल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.आंध्रप्रदेशातील उत्तरेचा भाग आणि ओदिशातील दक्षिणेचा भाग यांना या वादळाचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पुढील काही तासात वादळाचा वेग वाढणार असल्याने हवामान खात्याने आंध्रप्रदेश आणि ओडिशात यलो अलर्ट जारी केला आहे. 26 सप्टेंबरपर्यंत कलिंगपट्टनम भागात यामुळे जोरदार पाऊस पडण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना:पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे.पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. गोपीचंद रोहिदास भोसले (वय 30...

नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्देवी घटना: दोघा सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे जलाशयावर आंघोळीसाठी गेलेल्या राजूर येथील दोन भावंडांचा रविवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी पाण्याच्या भोवर्‍यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने राजूर...

भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांना पोलिसांनी केली अटक

माय महाराष्ट्र न्यूज:कृषीपंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. या राज्य शासनाच्या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणार्‍या...

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांंच्या अडचणीत वाढ होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करीत येथील निर्भय नवजीवन फाउंडेशनचे संदीप अशोक...

महाराष्ट्रात पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

माय महाराष्ट्र न्यूज: येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत....

राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे व संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटील म्हणतात….

माय महाराष्ट्र न्यूज:संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी...
error: Content is protected !!