Saturday, November 27, 2021

पुढे ढकललेली आरोग्य विभागाची परीक्षा ‘या’ दिवशी होणार ?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:विद्यार्थ्यांच्या हितासाठीच ही परीक्षा पुढे ढकलली आहे. ही परीक्षा रद्द नाही तर लांबणीवर टाकण्यात आली आहे. आरोग्य विभागाची बैठक घेऊन पुढील तारखा ठरवू आणि पुढील तारीख लवकरच कळवली जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

या असतील संभाव्य तारखा राजेश टोपेंनी दिलेल्या माहितीनुसार, साधारणपणे 15, 16 ऑक्टोबर किंवा 22, 23 ऑक्टोबरला होण्याची शक्यता आहे. या संभाव्य तारखा असतील, अशीही माहिती त्यांनी दिली आहे. शाळा सुद्धा सुरु होणार आहेत. त्यामुळे त्यांचं नियोजन बघून तारखा ठरवल्या जातील.

सामान्य प्रशासनाअंतर्गत असलेला आयटी डीपार्टमेंटने मागच्या सरकार आणि या सरकारच्या अनुषंगाने कंपन्यांंचं सिलेक्शन केलं. ही कंपनी आरोग्य विभागाने सिलेक्ट केली नाही. आरोग्य विभागाची जबाबदारी एकच होती, ती म्हणजे प्रश्नपत्रिका तयार करणे,

त्यामुळे ती कंपनी ब्लॅकलिस्ट आहे की नाही, हे पाहणं आयटी डीपार्टमेंटचं असतं. आमच्या विभागाचा बाकी काही संबंध नसतो. तरीसुद्धा आमच्या विभागाने तपसल्यानंतर कंपनीने आम्हाला वेळ पाहिजे असल्याचं कळवलं. म्हणून परीक्षा पुढे ढकलण्यात आली. जवळपास 95 टक्के काम झालेलंच होतं. मात्र, काही त्रुटी होत्या.

म्हणूनच हॉलतिकीट 10 दिवस आधी मुलांच्या हाती मिळतील, याची काळजी व्यवस्थित घेतली जाईल. आता कोणतीही ढिलाई दिसणार नाही. चांगल्या स्पिरिटने घ्यावं. 17 हजार जागा भरुन घेणे हाच आमचा हेतू आहे. आरोग्य सेवा सक्षम व्हावी, हा हेतू. आता न्याय देऊन सगळ्या जागा भरुन घेतल्या जातील.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात एकच खळबळ:काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी...

बापरे : पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय

माय महाराष्ट्र न्यूज: पोलिसांनी मानवी तस्करीचा भांडाफोड केला आहे. हे तस्कर बांग्लादेशातून तरुणी आणून भारतात देह व्यापाराच्या व्यवसायाता ढकलत होते. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह 8...

मोठी बातमी:महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली?आज अमित शहा, देवेंद्र फडणवीस व शरद पवार दिल्लीत भेट ?

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक नेते...

धक्कादायक :महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ...

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. तिसरी लाट जरी आली तरी अतिशय सौम्य प्रमाणात असल्याचा दावा राज्याचे...

नगर जिल्हा रुग्णालय :१४ जणांचा बळी घेणारी आग कशी लागली? अहवाल तयार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. सुमारे ६५...
error: Content is protected !!