Friday, December 3, 2021

छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:श्रीकृष्ण आयोगाच्या अहवालावरून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना त्रास देण्याचा कोणताही विचार नव्हता. या प्रकरणात त्यांना जामीन मिळाला नसता, तर मातोश्री लाच तुरुंग घोषित करणार होतो. तेव्हाच्या सर्वच गोष्टी सांगता येत नाहीत.

पण आता वीस वर्षांचा काळ लोटला असल्याने काही बाबी उघड करीत आहोत, असा खुलासा अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी केला.एका कार्यक्रमासाठी येथे आलेल्या ना. भुजबळ यांनी रविवारी (दि. 26) पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी त्यांनी वीस वर्षांपूर्वीच्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अटकनाट्यातील काही अलक्षित पैलूंना उजाळा दिला.ते म्हणाले, तेव्हा मी उपमुख्यमंत्री व गृहमंत्री होतो. माझ्यासमोर बाळासाहेब ठाकरे यांची फाइल आली. त्याआधी शिवसेना व बाळासाहेब ठाकरे यांच्यासंदर्भातील सर्व फाइल्स निकाली काढण्यात आल्या होत्या.

एवढी एकच फाइल प्रलंबित होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापना मेळाव्यात आम्ही श्रीकृष्ण आयोगाच्या शिफारशीनुसार कारवाई करणार असल्याचे जाहीर केले होते.पोलिसांनीही कारवाई करण्याची भूमिका कळवली होती. त्यामुळे आपली अडचण झाली व आपण फाइलवर सही केली.

पण बाळासाहेबांना त्रास व्हावा, अशी त्यामागे भूमिका नव्हती. कायद्याप्रमाणे निर्णय घ्यावे लागतात, तसे निर्णय घेतले गेले. त्यावेळी पोलिस आयुक्तांनाही आपण सूचना दिल्या होत्या की, ‘बाळासाहेबांच्या जामीन अर्जावर आक्षेप घ्यायचा नाही.

आपल्याला फक्त कायद्याप्रमाणे प्रक्रिया करायची आहे. समजा जामीन मिळाला नाही, तर ‘मातोश्री’लाच तुरुंग म्हणून जाहीर करायचे. म्हणजे बाळासाहेब ‘मातोश्री’मध्येच राहतील. बाळासाहेबांना त्रास होऊ नये, यासाठी बर्‍याच गोष्टींची काळजी घेतली गेली. आता सर्वच गोष्टी सांगता येत नाहीत.पोलिसांनीही कारवाई करण्याची भूमिका कळवली होती.

त्यामुळे आपली अडचण झाली व आपण फाइलवर सही केली. पण बाळासाहेबांना त्रास व्हावा, अशी त्यामागे भूमिका नव्हती. कायद्याप्रमाणे निर्णय घ्यावे लागतात, तसे निर्णय घेतले गेले. त्यावेळी पोलिस आयुक्तांनाही आपण सूचना दिल्या होत्या की, ‘बाळासाहेबांच्या जामीन अर्जावर आक्षेप घ्यायचा नाही.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!