Saturday, November 27, 2021

उद्या भारत बंद हाक: बँक युनियनपासून सर्व विरोधी पक्षांंचा संपाला पाठिंबा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:दिल्लीत शेतकरी आंदोलनाला समर्थन दर्शवण्यासाठी उद्या (सोमवारी) देशभरात भारत बंद आंदोलन पुकारण्यात येणार आहे. याला पाठिंबा देण्यासाठी बँक युनियनपासून सर्व विरोधी पक्षांनी शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा दिला आहे.

हा बंद सकाळी 6 ते संध्याकाळी 4 या वेळेत होणार असून त्या दरम्यान सर्व शासकीय आणि खासगी कार्यालये बंद असतील. तसेच शैक्षणिक आणि इतर संस्था, दुकाने, उद्योग आणि व्यावसायिक प्रतिष्ठाने आणि सार्वजनिक कार्यक्रम बंद राहणार आहेत.

राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्यानंतर तीन शेतकरी कायदे अस्तित्वात आले. यानंतर दिल्लीच्या वेशीवर मोठ्या प्रमाणात शेतकरी एकत्र जमले होते. या आंदोलनाच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त संयुक्त किसान मोर्चा (एसकेएम) ने सोमवारी भारत बंदची हाक दिली आहे.

त्याला राजकीय पक्षांसह समाजातील सर्व घटकांचा पाठिंबा मिळाला आहे.पंजाबचे नवनियुक्त मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांनी बंदला पाठिंबा दिला आहे. तर बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी देशव्यापी संपात सहभागी होण्याची घोषणा केली आहे. आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू

सरकारनेही देशव्यापी संपाला पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. काँग्रेसनेही सोमवारी निदर्शनांमध्ये सहभागी होणार असल्याचे म्हटले आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात एकच खळबळ:काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी...

बापरे : पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय

माय महाराष्ट्र न्यूज: पोलिसांनी मानवी तस्करीचा भांडाफोड केला आहे. हे तस्कर बांग्लादेशातून तरुणी आणून भारतात देह व्यापाराच्या व्यवसायाता ढकलत होते. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह 8...

मोठी बातमी:महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली?आज अमित शहा, देवेंद्र फडणवीस व शरद पवार दिल्लीत भेट ?

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक नेते...

धक्कादायक :महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ...

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. तिसरी लाट जरी आली तरी अतिशय सौम्य प्रमाणात असल्याचा दावा राज्याचे...

नगर जिल्हा रुग्णालय :१४ जणांचा बळी घेणारी आग कशी लागली? अहवाल तयार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. सुमारे ६५...
error: Content is protected !!