Friday, March 24, 2023

केंद्राप्रमाणे महाराष्ट्र सरकारही देणार या शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान निधी: मिळणार इतके पैसे

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्राप्रमाणे राज्य सरकारही शेतकऱ्यांना महासन्मान निधी देणार. केंद्र सरकारचे 6 हजार रुपये आणि राज्याचे 6 हजार रुपये, याप्रमाणे शेतकऱ्यांना वार्षिक 12 हजार

रुपये मिळतील, अशी महत्त्वपूर्ण घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर करत आहेत. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वपूर्ण

घोषणा केल्या. देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज हवामानात बदल झाल्यामुळे अनेक समस्यांनी अन्नदाता शेतकऱ्याला ग्रासले आहे. अशा स्थितीत सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे. कांदा

उत्पादकांना आवश्यक ती मदत केली जाईल. शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी पंतप्रधानांच्या संकल्पनेतून पीएम किसान सन्मान निधी योजना राबवली जात आहे. त्याला जोडूनच आता राज्य सरकारही शेतकरी महासन्मान निधी योजना राबवेल.

पीएम किसान सन्मान निधी योजनेत शेतकऱ्यांना हेक्टरी वार्षिक 6 हजार रुपये दिले जातात. आता त्यात राज्य सरकारकडूनही आणखी 6 हजार रुपये, अशा पद्धतीने शेतकऱ्यांना वार्षिक एकूण 12 हजार रुपयांचा निधी दिला जाईल.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यातील 1 लाख शेतकऱ्यांना महासन्मान निधीचा फायदा होईल. यासाठी राज्य सरकार दरवर्षी 6200 कोटी खर्च करेल. याशिवाय पीक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांना आतापर्यंत

विम्याची दोन टक्के रक्कम भरावी लागत होती. मात्र, आता ती रक्कमही शेतकऱ्यांना भरावी लागणार नाही. अर्जासाठी केवळ एक रुपया खर्च करुन शेतकऱ्यांना पीक विमा काढता येईल. त्यांचा विम्याचा पूर्ण हिस्सा

सरकार भरेल. यासाठी राज्य सरकारवर 3312 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार येईल.दुष्काळ तसेच अवकाळी पावसामुळे मराठवाडा व विदर्भातील शेतकरी वारंवार मेटाकुटीला येतात. तसेच, येथील

गोरगरीब जनताही त्रस्त होते. त्यामुळे या सर्वांना दिलासा देण्यासाठी यापुढे केशरी शिधा पत्रिकाधारकांना धान्याऐवजी रोख रक्कम दिली जाईल, अशी घोषणा देवेंद्र फडणवीसांनी केली.

देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, 2017 च्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील उर्वरित पात्र शेतकऱ्यांनाही योजनेचे लाभ देण्यात येतील. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती

योजनेतील लाभ या सरकारने दिले.12.84 लाख पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 4683 कोटी रुपये थेट जमा केले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!